
Mumbai, 20 March : दिशा सालियान मृत्यू प्रकरणावरून विधान परिषदेत आज (ता. 20 मार्च) जोरदार गदरोळ झाला. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा विषय सभागृहात उपस्थित केला. त्यावर बोलताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी कायंदे यांच्यावर जोरदार पलटवार केला. तो करताना त्यांनी हा मुद्दा सभागृहात का उपस्थित केला, हे सर्वांसमोर सांगून टाकले.
दिशा सालियान (Disha Salian) हिचा खून झाला असून या प्रकरणाची नव्याने चौकशी करण्यात यावी, यासाठी तिच्या कुटुंबीयाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानंतर राज्यभरात पुन्हा एकदा या प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप रंगले आहेत. या प्रकरणावरून सत्ताधारी पक्षाकडून पुन्हा एकदा आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
मनीषा कायंदे यांनी नाव न घेता उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना अनिल परब (Anil Parab) यांनी आदित्य ठाकरेंच्या केसची संपूर्ण हिस्ट्रीच सांगितली. गेली पाच वर्षांपासून ही केस सुरू आहे. सीबीआय, सीआयडी आणि एसआयटी आदी यंत्रणांच्या माध्यमातून चौकशी करण्यात आली. एसआयटीच्या चौकशीचा टेबल कुठे आहे, गेली दीड वर्षांत टेबल का नाही केला. टेबल केला नाही म्हणून एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशीही मागणी परब यांनी केली.
तुमचे सर्व विषय बाजूला जाव्यात म्हणून तुम्ही शिळ्या कढीला ऊत आणता का. आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) चौकशी करण्याला आमचं कायच म्हणणं नाही. पण मंत्री काय उत्तर देतात, की हा विषय न्यायप्रविष्ठ आहे. सामाजिक कार्यकर्त्याच्या याचिकेवरून या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे.
त्या प्रकरणावर १७ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होणार होती. पण मुख्य न्यायमूर्ती नव्हते, त्यामुळे पुढची तारीख देण्यात आली आहे. कालची याचिका ही त्या याचिकेला टॅग करावी, अशी याचिका आहे. ती कॉपी पेस्ट याचिका आहे, हे कोण करतंय हे न कळण्याइतपत आम्ही काय मूर्ख आहोत का, असा सवालही अनिल परब यांनी केला.
आदित्य ठाकरेंवर प्रस्ताव आणणाऱ्या मनीषा कायंदे यांचे एक ट्विट वाचून दाखवत त्यांनी सरड्यापेक्षा जास्त वेगाने रंग बदलला. का तर आता उपसभातिपदाच्या खुर्चीवर त्यांचा डोळा आहे. आत त्यांचं उपसभापतीकडे लक्ष लागले आहे. त्या खुर्चीकडं लक्ष लागलं आहे. आता त्यांना आपल्या वरिष्ठांना खूश करायचं आहे, असे गंभीर आरोप करत याच कारणामुळे त्यांनी हे प्रकरण सभागृहात मांडलं आहे, असा दावाही अनिल परब यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.