Maratha Reservation : 'हा' ओपिनियन पोल म्हणतो, मराठा समाज मागास; कुणी केलं हे सर्वेक्षण?

Manoj Jarange Patil : मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीच्या अहवालात दडलंय काय?
Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Eknath Shinde, Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News :

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांनी काल (16 फेब्रुवारी) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अहवाल सादर केला. मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी आयोगाने केलेल्या सर्वेक्षणाचा हा अहवाल होता.

या सोबतच आणखी एक अहवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सुपूर्त करण्यात आला. या अहवालानुसार मराठा समाज मागास आहे. त्यामुळे आता सरकार मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Chhagan Bhujbal News : "खोटी प्रमाणपत्रे देऊन मराठ्यांचे कुणबीकरण थांबवा" ; भुजबळ पुन्हा कडाडले!

मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाने (Maharashtra State Commission for Backward Classes) २३ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले होते. त्याचवेळी या सर्वेक्षणवर ई-मेलच्या माध्यमातून हरकती आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. या हरकती आणि सूचना 13 ते 19 जानेवारी या कालावधीत नोंदवायच्या होत्या.

या हरकती आणि सूचनांचा अहवाल महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या उपसमितीने तयार केला आहे. या ओपिनियन पोलच्या (Opinion Poll) अहवालानुसार मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास आहे, असा दावा करण्यात आल्याची माहिती मिळते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

31 टक्के लोक म्हणतात, 'ते' मागास

तब्बल 3 हजार 76 ई-मेल आले होते आणि त्यातील 951 ई-मेलमधून मराठा समाज मागास असल्याचा अभिप्राय आहे. 3 हजार 76 पैकी 951 ई-मेल म्हणजेच 31 टक्के लोक मराठा समाजाला मागास मानतात.

स्वतंत्र आरक्षण

विशेष म्हणजे या ओपिनियन पोलनुसार 267 ई-मेल म्हणजेच 9 टक्के लोकांनी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी केली आहे. ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण नको, असे मत त्यांनी मांडले आहे.

कोण म्हणतो मराठा समाज मागास?

एकूण 3 हजार 76 पैकी 1 हजार 271 ई-मेलचा अभिप्राय मराठा समाज सामाजिकदृष्ट्या मागास नाही, असा आहे. म्हणजेच एकूण ई-मेलपैकी 41 टक्के नकारात्मक अभिप्राय दिला आहे.

मतमतांतरे

यातील 191 ई-मेल म्हणजे 6 टक्के लोकांनी या सर्वेक्षणाला विरोध केला आहे आणि 146 ई-मेलमधून (5 टक्के) सर्वेक्षणातील त्रुटी दाखवून दिल्या आहेत, तर 8 टक्के लोकांनी (250 ई-मेल) इतर मते नोंदवली आहेत.

आयोग म्हणते 40 टक्के

दरम्यान, 31 टक्के लोकांचा मराठा मागास असल्याचा अभिप्राय आणि 9 टक्के लोकांचा स्वतंत्र आरक्षण देण्याचा अभिप्राय आहे. दोन्हींचा 40 टक्के लोकांचा अभिप्राय लक्षात घेऊन आयोगाने राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची शिफारस केल्याचे कळते.

(Edited by Avinash Chandane)

R

Eknath Shinde, Manoj Jarange Patil
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळणार, कुणबी नोंदीवरही निर्णय; मुख्यमंत्री शिंदे म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com