

Mhada : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणानं अर्थात Mhada (म्हाडा) 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्वावरील मुंबईतील १२० फ्लॅट्सच्या योजनेला स्थगिती दिली आहे. उद्यापासून या घरांसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरु होणार होती. पण आता ही योजना पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळं मुंबईत केवळ ३० लाखांमध्ये घर घेण्याची संधी चालून आलेली असताना त्याला स्थगिती मिळाल्यानं इच्छुक लाभार्थ्यांचा हिरमोड झाला असण्याची शक्यता आहे.
५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता या योजनेची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरु होणार होती. पण म्हाडाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे याला स्थगिती देण्यात आली आहे, म्हाडाकडून असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. त्यामुळं म्हाडाच्या वेबसाईटवर ५ फेब्रुवारीला या विशेष योजनेची सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका अपलोड होणार नाही. ३ फेब्रुवारी रोजी विविध वर्तमानपत्रांत योजना जाहीर करण्यात आली होती.
नवीन तारीख व वेळ लवकरच म्हाडाच्या संकेतस्थळावर व प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर होणार आहे. त्यामुळं अर्जदारांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणांकडेच लक्ष देण्याचे आवाहन म्हाडाच्यावतीनं करण्यात आलं आहे. इतर कुठल्याही वेबसाईटवरुन या योजनेसाठी अर्ज सादर करता येणार नाही. यासाठी केवळ https://bookmyhome.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरूनच अर्ज प्रक्रिया राबवली जाणार आहे. पण पुढची तारीख जाहीर झाल्यानंतरच याची इच्छुकांनी नोंद घ्यावी.
अँटॉप हिल - ३५ सदनिका
तुंगा पवई - ४४
शिंपोली कांदिवली - ८
जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम - ७
भायखळा - ६
ताडदेव - ६
लोअर परळ - ४
चारकोप सेक्टर -८ - २
पीएमजीपी मानखुर्द - १
मालवणी - १
गायकवाड नगर मालवणी - १
घाटकोपर पूर्व - २
कन्नमवार नगर -१
सायन - २
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.