BMC Commissioner : मुंबई महापालिकेला मिळणार महिला आयुक्त? 'या' अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर!

Woman BMC Commissioner Ashwini Bhide Manisha Mhaiskar : मुंबई महापालिका आयुक्तपदासाठी दोन वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांची नावे आघाडीवर आहेत.
new BMC Commissioner appointment update
new BMC Commissioner appointment updateSarkarnama
Published on
Updated on

Female IAS officer for BMC role: मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी हे 31 मार्चला सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे महापालिकेच पुढचे आयुक्त कोण असणार याची चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेमध्ये दोन वरिष्ठ महिला IAS अधिकाऱ्यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

आयुक्तपदासाठी मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव असलेल्या अधिकारी अश्विनी भिडे यांचे नाव चर्चेत आहे. त्यांच्यासोबतच अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांचे देखील नाव चर्चेत आहे.

75 हजार कोटी पेक्षा जास्त बजेट असलेल्या मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदासाठी वरिष्ठ आयएसएस अधिकाऱ्याला संधी मिळत असते. मुंबई महापालिकेवर भाजपची सत्ता स्थापन झाल्याने नेमकी कोणत्या अधिकाऱ्याला संधी मिळणार याची देखील चर्चा सुरू आहे. भिडे, म्हैसकर यांच्या नावांसह एमएमआरडीएचे आयुक्त संजय मुखर्जी, बांधकाम विभागाचे मुख्य सचिव मिलिंद म्हैस्कर यांचे नाव देखील आयुक्तपदासाठी आघाडीवर आहे.

भूषण गगरानी हे मार्च 2024 ला मुंबईचे आयुक्त झाले होते. दोन वर्षांच्या कालावधीनंतर ते 31 मार्चला सेवानिवृत्त होत आहेत. ते 1990 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.

new BMC Commissioner appointment update
tukaram mundhe : दिव्यांगांसाठी नवा अध्याय! सर्व सेवा ऑनलाइन; तुकाराम मुंढेंचा देशातील पहिला डिजिटल प्रयोग

पती-पत्नीचे नाव चर्चेत

मिलिंद म्हैसकर आणि त्यांच्य पत्नी मनीषा म्हैसकर या दोघांची नावे आयुक्तपदासाठी चर्चेत आहेत. 1992च्या बैचचे अधिकारी असलेले मिलिंद म्हैसकर यांनी केमिकल इंजिनिअरिंगमध्ये बी-टेक केले आहे. ते बांधकाम विभागाचे मुख्य सचिव आहेत. तर, मनीषा म्हैसकर या अतिरिक्त मुख्य सचिव आहेत.

new BMC Commissioner appointment update
Tejas brake failure : लढाऊ ‘तेजस’चा ब्रेक फेल! ताफ्यातील 30 विमानांच्या उड्डाणावर लष्कराची मोठी ब्रेकिंग कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com