नाराज बच्चू कडू 'नंदनवन'वर : CM शिंदेकडून लाल दिव्याचा मुहूर्त घेवूनच बंगला सोडला...

CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Shivsena | BJP : नाराजी नाही असं नाही. थोडी नाराजी तर आहेच.
Bacchu Kadu
Bacchu KaduSarkarnama

मुंबई : मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची नंदनवन बंगल्यावर जावून भेट घेतली. आधी ही भेट केवळ विकास कामांसाठी घेत असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले मात्र भेटीनंतर त्यांनी मंत्रिपदाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. यावेळी त्यांची नाराजी प्रकर्षाने दिसून आली. जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले. आणि जो पहिला गेले त्याला शेवट बसवले जात आहे. अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (Bacchu Kadu | Eknath Shinde Latest News)

बच्चू कडू म्हणाले, नाराजी नाही असं नाही. थोडी नाराजी तर आहेच. कारण जो उशीरा आला त्याला पहिल्या पंगतीमध्ये बसवले गेले आणि जो पहिल्यांदा गेला त्याला शेवट बसवले जात आहे. पण राजकारणात थोडं कमी जास्त होत असते. मात्र आम्ही केवळ मंत्रिपदासाठीच गेलो नव्हतो. मंत्रीपद दिले तरी चांगले, नाही दिले तर त्याहून चांगले. पण मुख्यमंत्री म्हणाले, मी शब्द दिला आहे आणि मी शब्द पाळणाऱ्यातील आहे. त्यावर माझा विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

Bacchu Kadu
Shiv Sena : फडणवीसांच्या दोन्ही मांड्यांवर पापाचीच ओझी शिंदे गटाने ठेवली ; शिवसेनेचं टीकास्त्र

पुढील मंत्रिमंडळ विस्तार सप्टेंबरमध्ये होईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असल्याची माहितीही कडू यांनी यावेळी बोलताना दिली. पण याच मंत्रिमंडळाचा विस्तार ४० दिवसांनी झाला आहे तर पुढचा विस्तार अडीच वर्षात होईल असे वाटते, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. काल बच्चू कडू यांनी अपक्ष आमदारांपैकी एका आमदाराला तरी पहिल्या यादीत स्थान मिळायला हवे होते अशी व्यक्त केली होती. त्यामुळे पुढील मंत्रिमंडळ विस्तारात बच्चू कडू आणि शिंदे गटातील अपक्ष आमदारांना स्थान मिळू शकते, असा अंदाज वर्तविला जात आहे.

Bacchu Kadu
RSS राजकारणात उतरणार का, मोहन भागवतांनी स्पष्टचं सांगितलं..

काल शपथविधी सोहळ्याला फिरकले नाहीत...

काल राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला तेव्हा बच्चू कडू शपथविधी सोहळ्याला उपस्थित नव्हते. त्यावेळी ते विधान भवनातच होते, अशी माहिती आहे. विधान भवनातील प्रहारच्या कार्यालयात ते त्यांच्या भागातील लोकांच्या विविध समस्यांचे पत्र तयार करत होते, असे सांगितले जात आहे.यावरून बच्चू कडू किती नाराज आहेत, याची कल्पना येवू शकते...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com