MLA Disqualification Case : राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं : संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut : संजय राऊत यांची विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर जोरदार टीका.
Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

भाग्यश्री प्रधान आचार्य :

Dombivli News : 'भाजपचे आताचे पुढारी आणि विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जो निकाल दिला, तो मॅच फिक्सिंगसारखा दिला. ते अपेक्षित होतंच. विधानसभाध्यक्ष यांच्यावर न्याय देण्याची जबाबदारी दिली होती. मात्र राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं,' असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

नार्वेकर हे शिंदेंच्या फुटलेल्या गटाचे वकील म्हणून वाचन करीत होते. त्यांनी चोराच्या वकीलपत्राचे वाचन गुरुवारी केले. सर्वोच्च न्यायालयाला खोटे ठरवण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षाने केला. पुढे आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आणि सत्य आणि न्याय याचाच विजय होतो, हे या महाराष्ट्राला दिसेल. याची आम्हाला खात्री असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjay Raut
MLA Disqualification Result : चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले कुणाचे अभिनंदन?

प्रत्येक डॉक्युमेंट त्यांच्यासमोर ठेवले होते. गोगावले यांची निवड चुकीची असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही सांगितले होते. त्यामुळे नार्वेकर यांनी स्वतःच्या मनाला प्रश्न विचारावा की हा निर्णय खरा होता की खोटा ? असा सल्लाही त्यांनी नार्वेकरांना दिला आहे.

'शिवसेना कोणाला घेता येणार नाही...'

'बाळासाहेबांच्या शिवसेनेने तुम्हाला मोठे केले. तुम्ही डरपोक असल्यामुळे पक्ष सोडला आणि आता तुम्हाला हे कबूल करण्याचीही हिंमत नाही. शिवसेना सहजासहजी कोणाला घेता येणार नाही,' असा निशाणा राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर साधला.

इतकेच नव्हे, तर तुम्ही चोर म्हटले म्हणून तुमच्यावर कारवाई होऊ शकते, असे विचारले असता त्यांनी चोराला चोर नाही तर काय म्हणायचे ? आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत, त्यामुळे आम्ही सत्यवचनी आहोत, असेही त्यांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या गुलामीच्या बेड्या तशाच ठेवाव्यात. महाराष्ट्राला स्वाभिमान शिकवायला जाऊ नये, अशी ताकीदच त्यांनी दिली.

'हे तर भाजपचे गुलाम...'

'एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीबद्दल वक्तव्य केले ते त्यांनी करू नये, कारण त्यांना एक मुलगा आहे आणि तोसुद्धा खासदार आहे. ज्यावेळी खासदारकीचे तिकीट द्यायची वेळ आली होती, त्यावेळी आम्ही गोपाळ लांडगे यांना तिकीट देणार होतो. मात्र एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यानुसार उद्धव ठाकरे यांनी श्रीकांत शिंदे यांना तिकीट दिले होते. आपण महापुरुषांच्या घरातील वंशांसमोर झुकतो, याचे कारण एक विचारधारा असते. यामध्ये कोणताही घराणेशाहीचा संबंध येत नाही. हे यांना कळणार नाही, हे तर भाजपचे गुलाम आहेत,' असा घणाघात राऊतांनी केला.

'मोदींनी मणिपूरच्या राम मंदिरात यावे...'

शिवसेना ज्या मंदिरात आरती करायला जाते, त्याच काळाराम मंदिरात पंतप्रधान जाणार आहेत. मणिपूरमध्येदेखील शिवसेना राम मंदिरात आरती करणार आहे. हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर येथील राम मंदिरातदेखील यावे, असे थेट आव्हान संजय राऊतांनी मोदींना दिले.

'दिल्लीच्या गुजराती लॉबीसमोर मराठी बाणा वाकणार नाही...'

दिल्लीच्या गुजराती लॉबीने कितीही मराठी स्वाभिमान वाकवण्याचा प्रयत्न केला, तरीही बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण असून आमचा मराठी बाणा कधीही वाकणार नाही आणि तुटणार नाही, असेही राऊतांनी स्पष्ट केले.

(Edited By- Ganesh Thombare)

R...

Sanjay Raut
MP Om rajeNimabalkar : निकाल काहीही लागो, निवडणुकीत तुमचा करेक्ट कार्यक्रम..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com