मनसेच्या अमेय खोपकरांच्या ट्वीटचा नेटकऱ्यांनी घेतला समाचार!

फटाके उडवणे मान्य नसल्यास मुंबई व देश सोडून जा, असे ट्वीट खोपकर यांनी केले होते.
Amey Khopkar
Amey KhopkarSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : `ज्या कुणाला फटाक्यांचा (Crackers) त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई (Mumbai) काय, देश (India) सोडून निघून जायचं` या ट्वीटवरून मनसे (MNS) नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांचा नेटकऱ्यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. खोपकर यांच्यावर चांगलीच टिका झाल्याने हे ट्वीट चर्चेत आहे. (Amey Khopkar tweets in Favour of Crackers in Diwali)

Amey Khopkar
Shivsena : शिवसेनेला मोठा धक्का ; अडीच लाख प्रतिज्ञापत्रांना केराची टोपली

अमेय खोपकर यांच्या या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद देत रिट्वीट केले. शिवसेनेसह अनेकांनी त्यावर टिकेची झोड उठवली. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळीची प्रतिज्ञा असलेला व्हीडीओ जोडला आहे.

Amey Khopkar
गुजरात निवडणुकीसाठी भाजपची नवी रणनीती; तिकीट वाटपात शहांची मोठी घोषणा

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलेली फटाकेमुक्त दिवाळीच्या प्रतिज्ञेचा व्हीडीओ टॅग करून, `तुम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मुंबई आणि देश सोडून जायला सांगायचे आहे का?` असा खोचक प्रश्न केला आहे. विविध नेटकऱ्यांनी तुमच्या साहेबांना विचारून ट्विट करत जा असे देखील म्हटले आहे.

यासंदर्भात एका वकिलांनी, `फटाक्याचा त्रास माणसांना होत नाही तर पर्यावरणाला होतोय. निसर्गाला असं बोलू नका नाही तर आपल्यावर निघायची वेळ येईल` असे उत्तर दिले आहे. अन्य एकाने `कोणत्या शाश्त्रात फटाके फोडण्याबद्दल लिहीले आहे`. एका मुंबईकर नागरिकाने मला फटाक्याचा अत्यंत त्रास होत आहे, आणि मी मुंबई सोडुन जाणार नाही...पण फटाके बंद करण्यासाठी प्रयत्नशील राहीन! असे उत्तर दिले आहे.

जेव्हा खुद्द आपल्या राज्यातील न्यायालये, सरकार आपल्याला फटाके न फोडण्याची विनंती करीत आहेत, तर आम्हाला सांगणारे तुम्ही कोण आहात? असा प्रश्न केला आहे. दिवाळी आणि फटाके याचा काही संदर्भ आहे का?. दिवाळी हा दिव्यांचा सण म्हणतात, फटाक्यांचा नाही. असंख्य नेटकरी या ट्वीटवर तुटून पडल्याचे पहायला मिळाले. पर्यावरण संवर्धन व फटाक्यांमुळे होणारे आजार याचा उल्लेख त्यात वारंवार झालेला दिसतो. त्यामुळे मनसे नेते अमेय खोपकर यांचा चांगालच समाचार घेतलेला दिसला.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com