MNS vs BJP : भेंडीबाजार, मोहम्मद अली रोडला जाऊन लोकांना मारुन दाखवा, नितेश राणेंच्या आव्हानाला संदीप देशपांडेंचं जोरदार प्रत्युत्तर

Sandeep Deshpande on Nitesh Rane : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेवरून मुंबईसह राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच या मुद्द्याला हिंदुत्वाशी जोडत भाजप नेते नितेश राणे यांनी हिंदू धर्मियांना मारहाण करणाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी भेंडीबाजार, नळबाजार किंवा मोहम्मद अली रोडला जाऊन लोकांना मारुन दाखवावं, असं आव्हान मनसेला केलं होतं.
Nitesh rane, sandeep deshpande
Nitesh rane, sandeep deshpandesarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 04 Jul : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापाऱ्याला मारहाण केल्याच्या घटनेवरून मुंबईसह राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच या मुद्द्याला हिंदुत्वाशी जोडत भाजप नेते नितेश राणे यांनी हिंदू धर्मियांना मारहाण करणाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी भेंडीबाजार, नळबाजार किंवा मोहम्मद अली रोडला जाऊन लोकांना मारुन दाखवावं, असं आव्हान मनसेला केलं होतं.

नितेश राणेंच्या या आव्हानाला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. काटा चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये, अशा शब्दात त्यांनी राणेंवर पलटवार केला आहे. तसंच भाजप नेत्यांनी चड्डीत रहावे, असा इशाराही देशपांडे यांनी दिला आहे.

Nitesh rane, sandeep deshpande
Uddhav-Raj Thackeray Alliance : ठाकरे बंधूंच्या युतीचा भाजप-शिंदेंना धसका... घाम फोडणारा मुंबईचा अंदाज समोर!

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

मिरा रोडमध्ये येथील परप्रांतीय व्यापाऱ्याला मारहाणी मुद्द्यावरून नितेश राणे यांनी मनसेवर टीका केली. ते म्हणाले, "हिंदू धर्मियांना मारहाण करणाऱ्यांमध्ये दम असेल तर त्यांनी मोहम्मद अली रोड आणि नळ बाजारात जाऊन आपली ताकद दाखवावी.

तिथेही मराठी भाषा ऐकायला येत नाही. तिथले दाढीवाले आणि गोल टोपीवाले मराठी बोलतात का? मनसे तिकडे जाऊन अशी हिंमत दाखवू शकेल का? आमचं सरकार हिंदुत्त्ववादी विचारांचं आहे. त्यामुळे आमच्या हिंदू बांधावांना मारणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल."

संदीप देशपांडे काय म्हणाले?

तर राणेंनी मनेसेची हिंमत काढताच संदीप देशपांडे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. देशपांडे म्हणाले, ज्या लोकांना मराठीतील 'श'चा उच्चार करता येत नाही, ते भाजपमधील नेते मीरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यासाठी फूस लावत आहेत. रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता.

Nitesh rane, sandeep deshpande
Sanjay Raut ON PM Modi: राऊतांनी दाखवला मोदींच्या मतदारसंघातील 'विकास'; सोशल मीडियावर फोटो शेअर

त्या वेळी त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्याची हिंमत दाखवणारा महाराष्ट्र निर्माण सेना हा एकमेव पक्ष होता. तेव्हा सर्व भाजपचे नेते शेपट्या घालून बसले होते. मात्र मनसे मोर्चा काढून त्यांना सरळ भिडली. त्यामुळे काटा-चमचा चालवणाऱ्यांनी आम्हाला तलवारी कशा चालवायच्या, ते शिकवू नये, अशा शब्दात त्यांनी राणेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com