

Mumbai News : मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप व एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे बहुमत आहे. त्यामुळे महापौर व उपमहापौर विराजमान झाला आहे. त्यानंतर स्थायी समितीचा अध्यक्ष भाजपचा झाला आहे. त्यानंतर पार पडलेल्या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदावरून मोठी रस्सीखेच पाहवयास मिळाली. ज्या ठिकाणी बहुमत आहे त्या ठिकाणच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या तर काही ठिकाणी काठावर बहुमत असलेल्या ठिकाणी जोरदार रस्सीखेच दिसून आली. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत चुरस रन्गली होती. एकीकडे सहा प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. तर सर्वाचे लक्ष लागलेल्या जी उत्तर प्रभाग समितीत शेवटच्या क्षणी मातोश्रीवरून आदेश पोहचताच राज ठाकरेंचा शिलेदार व मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांची बिनविरोध निवड झाली. उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी चक्र फिरवल्याने ही निवड बिनविरोध पार पडली.
मुंबई महापालिकेतील एकूण सहा प्रभाग समिती अध्यक्षपदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या सर्व प्रभागांमध्ये विरोधात कोणतीही उमेदवारी दाखल न झाल्याने त्या ठिकाणी उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित मानली जात होती. प्रभाग जी-उत्तर प्रभाग समितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि ठाकरेंच्या शिवसेनेत थेट लढत होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रभागात ठाकरे गटाचे जोसेफ कोळी आणि मनसेचे यशवंत किल्लेदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र अर्ज मागे घेण्याची मुदत संपण्याच्या अवघ्या 15 मिनिटे आधी जोसेफ कोळी यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे मनसेचे यशवंत किल्लेदार यांची जी-उत्तर प्रभाग समिती अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.
सहाही प्रभाग समित्यांमध्ये निवड झालेल्या समिती अध्यक्षांची यादी पुढीलप्रमाणे : एच-पूर्व/पश्चिम : रोहिणी कांबळे (शिवसेना ठाकरे), के-पश्चिम : रोहन राठोड (भाजप), के-दक्षिण/के-उत्तर : प्रकाश मुसळे (भाजप), पी-दक्षिण : श्रीकला पिल्ले (भाजप) जी-दक्षिण : पद्मजा चेंबूरकर (शिवसेना ठाकरे), जी-उत्तर : यशवंत किल्लेदार (मनसे) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
इतर प्रभाग समित्यांचा निकाल पुढीलप्रमाणे सी अँड डी : भाजप-अकाश पुरोहित (बिनविरोध), ए बी अँड ई : काँग्रेस -ज्ञानराज निकम, विजयी, भाजपच्या रोहिदास लोखंडे यांचा पराभव. एफ दक्षिण व एफ उत्तर ठाकरेंच्या श्रद्धा जाधव यांचा शिंदेंच्या शिवसेनेच्या मानसी सातमकर यांनी केला पराभव. आर उत्तर व आर मध्य भाजप- प्रकाश दरेकर (बिनविरोध), आर. दक्षिण विभाग भाजपच्या लिना देहेरकर (बिनविरोध), पी पूर्व आणि पी पश्चिम : राष्ट्रवादी काँग्रेस- अजित रावराणे यांचा काँग्रेसच्या हैदर अली शेख यांनी केला पराभव.
ठाकरे-मनसे समीकरणाची जोरदार चर्चा
जी-उत्तर प्रभाग समितीत सुरुवातीला ठाकरेंची शिवसेना (Shivsena) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता होती. मात्र ऐनवेळी जोसेफ कोळी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने मनसेचे यशवंत किल्लेदार बिनविरोध निवडून आले. या निर्णयामुळे ठाकरे गट आणि मनसे यांच्यात स्थानिक स्तरावर समन्वय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. स्वीकृत नगरसेवक पदाची एका जागेची मागणी मनसेने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे केली होती. मात्र, स्वीकृत नगरसेवक पदाची जागा उद्धव ठाकरे यांनी मनसेला सोडली नसल्याने दोन पक्षतील संबंध बिघडले होते. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना उमेदवारी अर्ज मागे घेणार की नाही याची उत्सुकता लागून राहिली होती. मात्र, 15 मिनिटाचा अवधी शिल्लक असताना माघार घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.