Thackeray Vs Shinde : "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल ; ठाकरे- शिंदे गटात आज पुन्हा जुंपणार ?

Thackeray Vs Shinde : शिंदे गट आक्रमक झाला आहे. या कामांच्या उद्धघाटनाच्या वेळी दोन्ही गटात राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Shinde vs Thackeray
Shinde vs Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Thackeray Vs Shinde : दोन दिवसापूर्वी प्रभादेवी परिसरात एल्फिन्सटन विभागातील विकासकामांवरुन शिंदे गट-ठाकरे गट सोमवारी) आमनेसामने आले होते. दोन्ही गटांमध्ये शाब्दीक चकमक झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप करीत काही जणांना ताब्यात घेतले होते. आज पुन्हा या परिसरात राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Thackeray Vs Shinde latest news)

एल्फिन्स्टन विभागातील मुरलीधर सामंत मार्ग, फिटवला रोड फुटपाथ नूतनीकरणाचे उदघाटन ठाकरे गटाचे आमदार अजय चौधरी यांच्या हस्ते आज (गुरुवारी) होणार आहे. या उद्धघाटनाला शिंदे गटाने विरोध केला आहे.

प्रभादेवी परिसरात ठाकरे गटातील कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. "बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल," असा मजकूर असलेले बॅनर ठाकरे गटाने लावले आहेत. त्यामुळे शिंदे गट आक्रमक झाला आहे. या कामांच्या उद्धघाटनाच्या वेळी दोन्ही गटात राडा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Shinde vs Thackeray
Gujarat Election 2022 : आपचा शोले स्टाईल प्रचार ; " सो जा बेटा, केजरीवाल तुम्हें जेल में डाल देगा,"

एल्फिन्स्टन विभागातील रस्त्याचे डांबरीकरण आणि फुटपाथ नूतनीकरण पूर्ण झाले आहे. याचा लोकापर्णासाठी शिंदे गटाचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर हे गेल्या सोमवारी या ठिकाणी गेले होते. तेव्हा ठाकरे गटाने त्यांना विरोध करीत शिंदे गटाच्या विरोधात घोषणाबाजी केली होती. यावेळी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमुळे चांगलीच जुंपली.

Shinde vs Thackeray
Ajit Pawar : "अजितजी अभी बस, अभी मुझे जाना है," ; अजितदादांनी सांगितला 'तो' किस्सा

सरवणकर यांना विरोध केल्याने येथे काही काळ तणाव होता. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. काही जणांना ताब्यात घेतले. 'पन्नास खोके-एकदम ओके'अशा घोषणा ठाकरे गटाचे कार्यकर्ते देत होते. महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमोरच हा सगळा प्रकार घडला.

समाधान सरवणकर म्हणाले, "रस्त्याचे डांबरीकरण आणि फुटपाथ नूतनीकरणांच्या कामासाठी मी पुढाकार घेतला होता, आम्ही विकास कामे सुरुच ठेवणार आहोत. आमदार अजय चौधरी यांच्याबाबत मी बोलणार नाही,"

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Sunetra Pawar Someshwar Election
dharashiv shivsena
Senior advocate Kapil Sibal argued before the Supreme Court during the hearing on the Shiv Sena split, party symbol dispute, and MLA disqualification petitions, presenting Uddhav Thackeray's case.
Sunetra Pawar-Eknath Shinde- Devendra Fadnavis
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com