मिस्टर फडणवीस, आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत !

sanjay raut | आमच्या लाऊडस्पिकरमुळे तुमचे कान बधीर होणार आहेत. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत.
Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut, Devendra Fadnavissarkarnama
Published on
Updated on

मुंबई : पनवेल येथील भाजपच्या बैठकीत भाजपचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी काल (शनिवारी) शिवसेनचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्याला राऊतांनी आज प्रत्युत्तर दिले. ते माध्यमांशी बोलत होते. (sanjay raut latest news)

"राज्यातील जनतेला संजय राऊतांनी वैताग आणला. शिवसेनेच्या जनतेला त्यांनी वैताग आणला. सगळ्यांना त्यांनी वैताग आणला. त्यामुळे सगळ्यांनी मिळवून ठरवलं की, हे 'लाऊडस्पीकर' बंद करायचं असेल तर सत्ता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही,"अशा शब्दात फडणवीसांनी काल राऊतांची खिल्ली उडवली .

त्याला राऊतांनी आज उत्तर दिले. ते म्हणाले, "आमचा आवाज बुलंद आहे, तो घुमत राहणार. शिवसेनेच्या गर्जनेपुढे तुमचा टीकाव लागणार नाही, शिवसेनेचा लाऊडस्पीकर तुम्हाला बधीर केल्याशिवाय राहणार नाही, चोऱ्यामाऱ्या करुन हे सरकार आले आहे. हे सरकार फार काळ टीकणार नाही. हे सरकार मजबूत पायावर उभे नाही, आमचा लाऊडस्पीकर ५६ वर्षांपासून सुरु आहे, आमचा लाऊडस्पीकर हा महाराष्ट्राच्या जनतेचा बुलंद आवाज आहे आणि तो तसाच घुमत राहील"

Sanjay Raut, Devendra Fadnavis
Sanjay Raut : चंद्रकांतदादाचं राऊतांनी केलं "अभिनंदन" ; भाजपला कानपिचक्या

"उद्धव ठाकरे लवकरच बाहेर पडणार आहेत, त्यांचाही लाऊडस्पिकर सुरू होणार आहे. आमच्या लाऊडस्पिकरमुळे तुमचे कान बधीर होणार आहेत. आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टिकणार नाहीत," असा टोलाही राऊत (Sanjay Raut) यांनी लगावला. भाड्याचे भोंगे आणि लाऊडस्पीकर यात फरक आहे असा टोलाही त्यांनी लगावला.

राऊत म्हणाले, "आधी सरकार स्थापन करा. एक महिन्यामध्ये हम दोनो, एक दुजे के लिए याच स्क्रिप्टमध्ये अडकून पडला आहात. कितीवेळा दिल्लीला जाताय? किती वेळा? मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील. ठिक आहे. भाजपचे राज्य आहे. ते म्हणत असतील शिंदेगट शिवसेना आहे. पण नाही. शिवसेना काल पैठणला दिसली, आदित्य ठाकरे यांचा दौरा सुरु आहे. या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले.

काल फडणवीस हे राऊतांबाबत बोलत असताना सभागृहातील कार्यकर्त्यांकडून जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. त्यावेळी फडणवीसांनी संजय राऊत यांचे आभार मानण्याचा सल्ला कार्यकर्त्यांना दिला.

Sanjay Raut, Devendra Fadnavis
फुटीरांना आता शांत झोप लागेल, ED त्यांच्या दारात जाणार नाही ; राऊतांचा टोला

"राऊतांनी सतत भाजपवर टीका केली, त्यामुळे राज्यात सत्तात्तर झाले. राज्यात शिंदे सरकार येण्यामागे राऊतांचा मोठा वाटा आहे, सकाळी नऊ वाजता बोलणारे आता कमी बोलू लागले, त्याचे काय कारण आहे मला माहित नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज. त्यांचे आभार माना. हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेव्हा इतर कुणाचाच नाही," असा टोला फडणवीसांनी यावेळी राऊतांना लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com