शिवसेना शाखेत खासदार श्रीकांत शिंदेंनी पाऊल ठेवलं अन् अश्रू अनावर झाले...

MP Shrikant Shinde : याच शाखेच्या कामकाजामधून श्रीकांत शिंदे खासदार झाले.
MP Shrikant Shinde Latest News
MP Shrikant Shinde Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

डोंबिवली : डोंबिवलीच्या शिवसेनेच्या (Shivsena) मध्यवर्ती शाखेवरून शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर शिंदे गटाकडून ही शाखा कायदेशीररीत्या आपल्या ताब्यात घेतली.

मात्र शाखेच्या वाद सुरू असल्यापासून खासदार श्रीकांत शिंदेंनी शाखेत पाऊलही ठेवले नव्हतं. मात्र काल त्यांनी शाखेत पाऊल ठेवलं आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळलं होतं. (MP Shrikant Shinde Latest News)

MP Shrikant Shinde Latest News
'50 खोके' दुखवताहेत डोके? बंडखोर आमदारांमध्ये वाढतेयं अस्वस्थता...

याच शाखेच्या कामकाजामधून श्रीकांत शिंदे खासदार झाले. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते शाखेत येत नव्हते. काल (ता.१३ नोव्हेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विविध कामाच्या भूमीजनासाठी डोंबिवलीत आले असताना या मध्यवर्ती शाखेत आले होते. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे हे देखील त्यांच्यासोबत होते.

त्यावेळी खासदार शिंदेंनी शाखेत प्रवेश करताना शाखेच्या पायरीवर ते नतमस्तक झाले आणि त्यानंतर त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. त्यांचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला होत आहे.

MP Shrikant Shinde Latest News
आव्हाड प्रकरणात नवा ट्विस्ट; आरोप करणाऱ्या महिलेविरोधात अॅट्रॉसिटीची तक्रार

दरम्यान, डोंबिवलीतील या शाखेरवरून शाखा कुणाची म्हणून दोन्ही गटात मोठा राडा झाला होता. त्यानंतर ही शाखा शिंदे गटाने आपल्या ताब्यात घेतली आहे. त्यानंतर या शाखेला पूर्ण रंगरंगोटी करण्यात आली होती. त्यानंतर काल मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) काल या शाखेला उपस्थिती लावली. त्यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com