

Mumabi News : राज्यातील 29 महानगरपलिकासाठी सध्या निवडणुकीची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला शेवटचे सात दिवस शिल्लक असल्याने प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. महापालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे, त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे. त्यातच मुंबईतील एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारावर प्रचारावेळी अज्ञात इसमाने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये जखमी झाल्याने उमेदवाराला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऐन निवडणूक काळात प्रचार करीत असताना हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस यंत्रणेकडून या हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक 92 चे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशीवर बुधवारी दुपारी हल्ला करण्यात आला. बांद्रा येथील ज्ञानेश्वर नगर परिसरात कुरेशी हे प्रचार करत होते. यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात उमेदवारी कुरेशी हे जखमी झाले आहेत. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर या परिसरात एकच खळबळ उडाली.
उमेदवार कुरेशी यांच्यावर अचानक हल्ला झाल्याने ते जखमी झाले आहेत. कुरेशी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची तब्येत स्थिर असल्याची माहिती सूत्राने दिली आहे. दरम्यान, शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशीवर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच कार्यकर्त्यांनी होती. या प्रकारानंतर या परिसरातील वातावरण चांगलेच तापले होते. या परिसरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुकीतील प्रचार आता गुद्यागुद्दीवर आल्याचे दिसून आले आहे. छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएममध्ये तिकीट वाटपावरून प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्याविरोधात असलेला रोष मोठ्या प्रमाणात वाढला असून शहरातील जिन्सी भागातून प्रचारासाठी जात असताना इम्तियाज जलील यांच्या गाडीवर विरोधक जमावाने हल्ला चढवला.
हाताने काचा फोडण्याचा प्रयत्न, तसेच इम्तियाज जलील यांना गाडीतून बाहेर ओढण्याचा प्रयत्न झाला. प्रचारा दरम्यान, इम्तियाज यांना जागोजागी विरोध होत असून या हल्ला प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.