Mumbai Mayor Legal Trouble: मुंबईच्या महापौर रितू तावडेंना सत्र न्यायालयाचा मोठा झटका! अर्ज फेटाळल्याने अडचणीत वाढ

Vakola Urdu school incident News : मुंबईच्या महापालिकेच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारून रितू तावडे यांना महिनाभराचा कालावधी झाला आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी त्यांच्या कारवर लाल दिवा लावला असल्याने त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केले होते.
Mumbai mayor Ritu Tawde sessions court decision
Mumbai mayor Ritu Tawde sessions court decisionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News: मुंबईच्या महापालिकेच्या महापौरपदाचा पदभार स्वीकारून रितू तावडे यांना महिनाभराचा कालावधी झाला आहे. काही दिवसापूर्वीच त्यांनी त्यांच्या कारवर लाल दिवा लावला असल्याने त्यांच्यावर विरोधकांनी आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी गाडीवरील लाल दिवा काढला असल्याचे स्पष्ट केले होते.

त्यातच आता नऊ वर्षापूर्वीच्या एका खटल्यात महापौर तावडेंना सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वाकोला येथील मुंबई महापालिकेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेतील दोन शिक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातून आरोपमुक्त करण्याचा रितू तावडे यांचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता खटला चालणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वाकोला येथील उर्दू माध्यमाच्या शाळेत 29 जुलै 2016 रोजी घडलेल्या घटनेप्रकरणी तावडे यांच्याविरोधात आरोप निश्चित करण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे निरीक्षण नोंदवत अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाय. पी. मानथकर यांनी त्यांचा अर्ज नुकताच फेटाळला. याप्रकरणी पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरनुसार, शास्त्री नगर, वाकोला, सांताक्रूझ पूर्व येथील या शाळेतील शिक्षिका शाहीन खान या कॅन्सरग्रस्त असूनही यांची अचानक वांद्रे-कुर्ला संकुलात बदली करण्यात आल्याने भाजपच्या तत्कालीन नगरसेविका रितू तावडे व अन्य काही जण नाराज होते.

Mumbai mayor Ritu Tawde sessions court decision
Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचा क्रांतीकारी निर्णय; 'त्या' नावांमधून हटविला मागासवर्गीय शब्द, शासन आदेश काढला...

त्यामुळे रितू तावडे (Ritu Tawade) व अन्य सहा जण मुख्याध्यापिक शरीफा मोमिन यांना जाब विचारण्यासाठी शाळेत गेले होते. त्यावेळी त्यांनी मुख्याधिपकांशी हुज्जत घातली आणि शाब्दिक चकमक वाढल्यानंतर रितू तावडे यांनी मोहम्मद याकुब रशीद व नदीम अहमद शेख यांच्या कानशिलात लगावली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Mumbai mayor Ritu Tawde sessions court decision
Captain Ashok Kharat Crime : राजकारण्यांचा ज्योतिषी अशोक खरात अनेक कोटींचा मालक कसा झाला? धक्कादायक माहिती समोर...

तर दुसरीकडे हे सर्व आरोप फेटाळताना रितू तावडे यांच्यातर्फे न्यायालयात युक्तिवाद करण्यात आला. त्यामध्ये मी त्याठिकाणी केवळ योगायोग म्हणून उपस्थित होते. कथित घटनेत गुन्हा करण्याचा कोणताही हेतू दिसत नाही.

भाजप (BJP) नगरसेविका असल्याने फिर्यादींनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी माझ्या त्या राजकीय दर्जाचा गैरफायदा घेतला. शिवाय कथित घटना घडल्यानंतर 13 दिवसांच्या विलंबानंतर हा एफआयआर नोंदवण्यात आला. त्यावरून फिर्यादींची पश्चातबुद्धी व राजकीय कुहेतू स्पष्ट होतो, असे त्यांच्या वकिलांनी कोर्टात स्पष्ट केले.

Mumbai mayor Ritu Tawde sessions court decision
Dhananjay Sawant Accident News: भाजपमध्ये प्रवेश करुन परताना शिवसेनेच्या माजी मंत्र्यांच्या पुतण्याचा बारामतीजवळ अपघात

या प्रकरणात सरकारी वकिलानी देखील बाजू मांडली. तावडे यांनीच मारहाण केल्याचे पीडितांनी जबाबांत स्पष्ट म्हटले आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसमोर आदर्श ठेवणे अभिप्रेत असताना त्यांच्याबाबत मारहाणीची घटना घडली. त्यामुळे याकडे गांभीर्याने पहायला हवे’, असा युक्तिवाद सरकारतर्फे सरकारी वकील इकबाल सोलकर यांनी मांडला. यामध्ये घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि साक्षीदारही असल्याचे स्पष्ट केले.

Mumbai mayor Ritu Tawde sessions court decision
Ashok Kharat Case : 'रुपाली चाकणकरच अत्याचाराच्या मुखिया…','कॅप्टन' प्रकरणावरून रुपाली ठोंबरेंची जहरी टिका

या प्रकरणात न्यायाधीशांनी दोन्ही बाजू तपासल्यानंतर, तावडे यांच्याविरोधात पीडित व अन्य साक्षीदारांनी थेट आरोप केल्याचे निरीक्षण नोंदवले. तसेच आरोपनिश्चितीच्या टप्प्यावर न्यायालयाने जबाबांची विश्वासार्हता तपासणे अभिप्रेत नसते.

आरोप निश्चितीसाठी पुरेसे पुरावे दिसत आहेत. त्यामुळे अर्ज मान्य केला जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत न्यायाधीशांनी तावडे यांचा अर्ज फेटाळून लावला. नऊ वर्षापूर्वीच्या या खटल्यात महापौर तावडेंना सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

Mumbai mayor Ritu Tawde sessions court decision
Namo Shetkari Yojana : शेतकऱ्यांना मोठा दिलासा! अखेर नमो शेतकरी योजनेच्या ८ व्या हप्त्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी जमा होणार पैसे

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com