Deven Bharti: मुंबई पोलीस आयुक्तांच्या तोंडी राजकीय भाषा : मविआ सरकारच्या कालखंडावर टीका करत CM फडणवीसांवर स्तुतीसुमने

Mahavikas Aaghadi News: राज्य शासनाच्या गृह विभागाच्या या निर्णयानुसार,आता मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा आता पोलीस महासंचालक DGP पदी समावेश झाला आहे.
Mumbai Police Commissioner Deven Bharti
Mumbai Police Commissioner Deven Bharti Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai Police News: मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील प्रमुख पदांवरील नेत्यांना टोला लगावला आहे. त्यांच्या या राजकीय वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.त्यांच्या वक्तव्याचे काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या आधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांचा लोकार्पण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. या भारती यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांला उधाण आलं आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी पोलिस दलाच्याच एका कार्यक्रमादरम्यान 2019 नंतरच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात पोलिस आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञान प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाल्याचं म्हटलं आहे.

देवेन भारती यांनी पोलिस दलाच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच केलेल्या वक्तव्यामुळे नवा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे.भारती आपल्या भाषणात म्हणाले, मुख्यमंत्री महोदय, आजचा जो काही टप्पा आहे, तो आम्ही अचानक गाठलेला नाही. 2017 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं.

Mumbai Police Commissioner Deven Bharti
Raigad Politics : रायगडात अवघ्या आठवडाभरातच राजकीय चित्र बदलले; राष्ट्रवादीत मोठी इनकमिंग! शिवसेनेसह अन्य पक्षांना धक्का

पोलिस आयुक्त देवेन भारती अप्रत्यक्षरित्या तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला टीका केली आहे. ते म्हणाले, 2019 नंतर अनेक प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले आणि त्यातील अनेक प्रकल्प बंद करण्यात आले. तसेच 'डायल 122'सारख्या प्रकल्पातील काही आधुनिक सुविधा थांबवून पुन्हा जुन्या पद्धतीचा वापर करावा लागल्याची खंतही वरिष्ठ पोलिस अधिकारी भारती यांनी बोलून दाखवली.

महाराष्ट्र पोलीस दलातील प्रशासकीय पातळीवर राज्य शासनाच्या गृह विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील दोन वरिष्ठ भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकाऱ्यांना पोलीस महासंचालक (DGP) श्रेणीत बढती देण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन आदेश 20 नोव्हेंबर 2026 रोजी जारी करण्यात आला आहे. याचा लाभ मुंबई आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तपदी कार्यरत असलेल्या दोन्ही दिग्गज अधिकाऱ्यांना मिळाला आहे.

Mumbai Police Commissioner Deven Bharti
Farmers loan Waiver : कर्जमाफीचा दुसरा टप्पा सुरू; पुण्यातील 16 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा मार्ग मोकळा; ओटीएसची पहिली यादी जाहीर

राज्य शासनाच्या गृह विभागाच्या या निर्णयानुसार,आता मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा आता पोलीस महासंचालक DGP पदी समावेश झाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.