Shiv Sena MLA Disqualification : माझा निर्णय हा महाराष्ट्राला न्याय देणारा असेल; राहुल नार्वेकरांची ग्वाही!

MLA Disqualification Case : "आपला शेड्युल १० मधला जो कायदा आहे, तो बदलत राहणारा कायदा आहे. "
Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Uddhav Thackeray Vs Eknath ShindeSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena News : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजच पार पडणार आहे. आज होणारी सुनावणी शुक्रवारी अपेक्षित होती. परंतु अध्यक्षांच्या वेळापत्रकात काही बदल झाल्यामुळे ही सुनावणी एक दिवस आधी म्हणजे आज घेण्याचे निश्चित झाले आहे.

आमदार अपात्रतेवर सुनावणीनंतर नार्वेकर दिल्लीला रवाना होणार आहेत. दरम्यान, सुनावणी पार पडण्यापूर्वी नार्वेकरांनी या प्रकरणी सूचक विधान केले आहे. (Latest Marathi News)

नार्वेकर म्हणाले, "संसदीय लोकशाही ही आपली सतत बदल होत राहणारी व्यवस्था आहे. आपला शेड्युल १० मधला जो कायदा आहे, तो बदलत राहणारा कायदा आहे. प्रत्येक वेळी याच्यात संशोधन करून वेळोवेळी बदल करण्यात आले.

दहा वर्षांपूर्वी शेड्युल १० संदर्भातला जो कायदा होता, तो कितीतरी कमजोर होता. तो वेळोवेळी बळकट केला गेला आहे. आताच्या परिस्थितीत यात संशोधन करून न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार कायद्यात बदल होण्यासाठी अधिक तरतुदी केल्या जातील. परंतु माझा निर्णय हा महाराष्ट्राला न्याय देणारा असेल."

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
MLA Disqualification Case : शरद पवार गटाला झटका; आमदार अपात्रतेप्रकरणी स्वतंत्र सुनावणीस नकार, शिवसेना-राष्ट्रवादीची एकत्र सुनावणी होणार

दरम्यान, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आज होणं अपेक्षित आहे. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी याबाबतचा प्राथमिक निकाल अपेक्षित आहे. आमदारांच्या ज्या याचिका आहेत, त्यावर स्वतंत्र सुनावणी घ्यायची की, एका वेळी एका गटाचं मत आणि दुसऱ्यावेळी दुसऱ्या गटाचं मत ऐकून घेतलं जावं, यावर विचार सुरू आहे. यावर शिवसेना पक्षाच्या दोन्ही गटांची मते वेगवेगळी आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचं मत आहे की, प्रकरण एकच असल्याने सर्व आमदारांच्या एकगठ्ठा याचिकांवर एकत्र सुनावणी घ्यावी, तर शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की, प्रत्येक आमदाराच्या याचिकेवर स्वतंत्रपणे सुनावणी घ्यावी. त्यामुळे अध्यक्षांपुढे दोन्ही बाजूंचा युक्तिवाद याच मुद्द्यावर होणार आहे.

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde
Shiv Sena MLA Disqualification : आमदार अपात्रतेच्या सुनावणीनंतर अध्यक्ष नार्वेकर तातडीने दिल्लीला जाणार; काय आहे कारण ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.