Kolhapur Politic's : सतेज पाटलांना लक्ष्य करत राजेश क्षीरसागरांनी ‘दक्षिणोत्तर’ विजयाचे रणशिंग फुंकले

Rajesh Kshirsagar News : स्थानिक लोकप्रतिनिधींनी दक्षिणच्या नागरिकांचा निव्वळ राजकारणासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या दुर्लक्षामुळेच दक्षिण मतदारसंघ भकास झाला आहे.
Rajesh Kshirsagar
Rajesh Kshirsagar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची घोडदौड सुरू आहे. मुख्यमंत्री शिंदे यांची कामांमुळे जनमानसात लोकप्रियता वाढत आहे. त्यांचे कोल्हापूर जिल्ह्यावर विशेष असे लक्ष असून, शिवसेनेचे सर्व बालेकिल्ले पुन्हा काबीज करण्यासाठी पक्ष सज्ज आहे. येत्या २०२४ च्या निवडणुकीत दक्षिणोत्तर शिवसेनेचाच भगवा फडकेल, अशी घोषणा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केली. याचवेळी त्यांनी माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावरही नाव न घेता टीका करता कोल्हापुरात भगवा फडकविण्याचा निधार्र केला आहे. (Shiv Sena will win Kolhapur South & North constituencies in upcoming 2024 elections : Rajesh Kshirsagar)

राजेश क्षीरसागर यांनी हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने आपल्या वाढदिवशी ‘संघर्ष हीच माझी ओळख, जनतेच्या साथीने पुन्हा भगवा फडकविणार’ अशी घोषणा केली. क्षीरसागर यांनी वाढदिवसाचे निमित्त साधून आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तिप्रदर्शन केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rajesh Kshirsagar
Shivsena-Bjp Alliance : भाजपसोबत पुन्हा युती करण्याचा ठाकरेंचा प्रयत्न; भाजप आमदाराचा गौप्यस्फोट

कोल्हापूर महापालिका हद्दीत उत्तरसह दक्षिण मतदारसंघातील काही प्रभाग समाविष्ट आहेत. याशिवाय शहराला लागून असलेली गावेही त्यात येतात. यापूर्वी आमदार या नात्याने कार्यरत असताना कोल्हापूर उत्तर विधानसभा कार्याक्षेत्राला प्राधान्य दिले होते, पण सध्या वाढलेले वसाहतीकरण, नव्याने निर्माण झालेली उपनगरे ही बहुतांश दक्षिण विधानसभा क्षेत्रात आहेत. या ठिकाणच्या नागरिकांसह शहरालगतच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या गावांमध्येही मूलभूत सोयी सुविधांचा वानवा आहे, असा आरोप राजेश क्षीरसागर यांनी केला.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी दक्षिणच्या नागरिकांचा निव्वळ राजकारणासाठी उपयोग करून घेतला. त्यांच्या दुर्लक्षामुळेच दक्षिण मतदारसंघ भकास झाला आहे, असा आरोप क्षीरसागर यांनी नाव न घेता सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्यावर केला. दक्षिणमधील नागरिकांच्या मागणीस मान देऊन त्या ठिकाणी विकासकामांच्या माध्यमातून लक्ष केंद्रित केले आहे. मतदारसंघाचा कोणताही भेदभाव न ठेवता दक्षिण आणि उत्तर दोन्ही मतदारसंघात दक्षिणोत्तर विकासपर्वाची सुरुवात केली आहे, असेही क्षीरसागर यांनी सांगितले.

Rajesh Kshirsagar
Sangola Politics : दीपक साळुंखेंनी वाढविले शहाजीबापू पाटलांचे टेन्शन...

कोल्हापूर दक्षिण-उत्तर या दोन्ही मतदारसंघांत शिवसेनेला मानणारा मोठा वर्ग आहे. आतापर्यंतच्या सर्वच निवडणुकांमध्ये त्याचा प्रत्यय आलेला आहे. उत्तर शिवसेनेचा बालेकिल्ला असून, दक्षिण मतदारसंघ काबीज करण्याची तयारी शिवसेनेने केली आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघांत नागरिकांचे प्रेम, आशीर्वाद मोठ्या प्रमाणात मिळत आहे.

विकास, सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून दोन्ही मतदारसंघांत सुरू असलेला जनसंपर्क उपस्थित शिवसैनिक आणि हितचिंतकांच्या प्रेमातून दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा मतदारसंघांत शिवसेनेचा भगवा फडकेल, असा विश्वास राजेश क्षीरसागर यांनी बोलून दाखवला

Rajesh Kshirsagar
Ajit Pawar Group News : सुनावणी सुरू असतानाच अजित पवार गटाचे महत्त्वपूर्ण पाऊल...कर्जतमध्ये ठरणार राजकीय रणनीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com