NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार; दोन नगराध्यक्षांसह १२ नगरसेवक शिंदे गटात दाखल

State Government : ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांचाही प्रवेश; सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये 'इनकमिंग' कायम
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : कर्नाटकमध्ये १३५ जागा जिंकून काँग्रेसने एकहाती सत्ता स्थापन केली. या विजयाने देशभरात काँग्रेसला नवसंजिवनी मिळाल्याचे बोलले जात आहे. या विजयामुळे राज्यातील महाविकास आघाडीतल घटक पक्षांना चांगलेच स्फूरण चढले आहे. आता महाराष्ट्रात करिश्मा दाखविणार असे दावे महाविकास आघाडीतील नेते करीत आहेत. असे असतानाही आघाडीच्या नेत्यांना आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना रोखण्यात अपयश येत असल्याचे दिसून येत आहे.

Eknath Shinde
Girish Mahajan and Nashik BJP : प्रभारी नेमणुकीतून गिरीश महाजनांचे अधिकार छाटले ? पालवेंनी केला खुलासा

आगामी काळात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यात (Maharashtra) निवडणुकांचे वारे वाहत आहे. महाविकास आघाडीत जागावाटपावरून दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेत आणि भाजपतील इन्कमिंग काही केल्या महाविकास आघाडीला रोखता येत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला सलग दुसरा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नगराध्यक्षासह १५ नगरसेवकांनी सत्ताधारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थित ठाण्यातील निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

Eknath Shinde
Maharashtra Politics : खोका स्टोरी-सैराट-माकडाच्या हाती कोलीत; महाराष्ट्रात पाॅलिटीकल फिल्लमबाजी सुरू!

गोंदिया जिल्ह्यात ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) मोठा धक्का बसला आहे. येथील अर्जुनी मोरगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या २ नगराध्यक्ष आणि तब्बल १२ नगरसेवकांनी केला शिवसेनेत प्रवेश केला आहे. तर ठाकरे गटाच्या ४ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला आहे.

अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदासंघाचे राष्ट्रवादीचे युवा नेते डॉ. सुगत चद्रिकापुरे यांच्या नेतृत्वाखाली सडक अर्जुनी नगर पंचायत मधील विद्यमान नगराध्यक्ष तेजराम मडावी यांचे सहित १२ विद्यमान नगरसेवकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

Eknath Shinde
Pune News: अवघ्या काही महिन्यांपूर्वी भाजपात आलेल्या नेत्याच्या नवीन घरी बावनकुळेंची भेट; जुन्या, निष्ठावंतांच्या भुवया उंचावल्या

यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुरंदर हवेलीचे माजी आमदार अशोक टेकवडे (Ashok Tekwade) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये माजी आमदार टेकवडे यांनी जाहीर प्रवेश केला. अशोक टेकवडे २००४ ते २००९ या काळात पुरंदर हवेलीचे आमदार राहिले आहेत. दरम्यान, भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचा गड जिंकण्याचे ठरविले आहे. त्यासाठी मिशन बारामती राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर टेकवडे यांनी भाजप प्रवेश केला. तो राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com