Nilesh Lanke : नीलेश लंकेंचा स्वॅगच भारी विधानभवनात 'दबंग' स्टाइल एन्ट्री

Nilesh Lanke at vidhimandal Adhiveshan : संसदेच्या अधिवेशनातून 'फ्री' झालेल्या नीलेश लंकेंची विधानभवनात थाटात एन्ट्री
Nilesh Lanke at vidhimandal Adhiveshan
Nilesh Lanke at vidhimandal AdhiveshanSarkarnama

Nilesh Lanke : अहमदनगरच नव्हे तर महाराष्ट्राच्या राजकारणातलं बडं प्रस्थ मानले जाणारे. विखे घराण्याला राजकीय हादरा देणारे आणि दिल्लीच्या राजकारणात गेलेले खासदार नीलेश लंके आज विधानभवनामध्ये आले.

विधानभवनात त्यांची रुबाबदार एन्ट्री झाली. अगदी एखाद्या मुख्यमंत्र्यांभोवती जेवढी गर्दी असावी अशीच गर्दी नीलेश लंके यांच्या भोवती होती. ही कार्यकर्त्यांची गर्दी विधानभवनाच्या गेटपासून अगदी पायऱ्यांपर्यंत राहिली.

प्रत्येकासोबत सेल्फी, प्रत्येकासोबत बोलणं या आपल्या स्टाइलने नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी विधानभवनात पुन्हा एकदा आपली हवा केली. अगदी विधिमंडळात (Vidhimandal) आत येतानाच त्यांनी हात उंचावत विक्ट्री असं चिन्ह दाखवलं. यानंतर मीडियाने त्यांना गराडा घातला. शिवाय ते विधिमंडळाच्या पायऱ्यांवर येतात अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केल्याचं ही पाहायला मिळालं.

Nilesh Lanke at vidhimandal Adhiveshan
Nilesh Lanke: राजकारणाच्या मैदानात सुजय विखे यांना चितपट करणारे नीलेश लंके कबड्डीच्या डावात 'बाद'

आपल्या बिनधास्त शैलीत बोलण्यासाठी प्रसिद्ध असणारे लंके यावेळी देखील कार्यकर्त्यांमध्ये मिसळल्याच पाहायला मिळालं. त्यामुळे नगरमधून (Nagar) दिल्लीला गेलेल्या लंकेचा दबदबा मुंबईतही असल्याचे दिसून आले आहे.

Nilesh Lanke at vidhimandal Adhiveshan
Manoj Jarange Patil : छगन भुजबळ यांच्या मतदारसंघासाठी जरांगे पाटील आज घेणार मोठा निर्णय?

विधान परिषदेच्या आमदारांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लंकेची आज विधिमंडळात हजर राहणे महत्त्वाचे मानले जात आहे. राज्यातील विविध पक्षाचे बडे नेते आमदारांची जुळवाजुळव करायला लागले आहेत. अशातच लंकेंसारखा नेता विधिमंडळात हजर राहणं हे निवडणुकीच्या घडामोडींसाठी महत्त्वाचं मानलं जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com