सोमय्यांची जखम खरी की खोटी? वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केला होता हल्ला
Kirit Somaiya latest Marathi news
Kirit Somaiya latest Marathi newsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर हल्ला झाल्यानं राजकारण तापलं आहे. शिवसैनिकांनी हा हल्ला केल्याचा दावा सोमय्यांनी केला आहे. सोमय्यांना झालेली जखम खरी की खोटी, असा वाद सुरू झाला होता. शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत यांनी तर सोमय्यांनी तोंडाला सॉस लावल्याचा दावा केला होता. या वादावर आता पडदा पडला असून, सोमय्यांचा वैद्यकीय तपासणीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Kirit Somaiya latest Marathi news)

सोमय्यांवर हल्ला झाल्यानंतर त्यांची भाभा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचा अहवाल आता रुग्णालयाकडून मिळाला आहे. सोमय्यांना किरकोळ जखम झाल्याचे या अहवालात म्हटले आहे. मात्र, या जखमेतून रक्तस्राव झाला नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. याचबरोबर सोमय्यांना कोणताही गंभीर दुखापत झाली नसल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Kirit Somaiya latest Marathi news
युद्ध अखेरच्या टप्प्यात? अण्वस्त्र हल्ल्याची रशियाची युक्रेनला थेट धमकी

‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाच्या आंदोलनाचा प्रयत्न करणं खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांना महागात पडलं आहे. त्यांना पोलिसांनी अटक केली असून, सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांना भेटण्यासाठी सोमय्या पोलीस ठाण्यात गेले असता 23 एप्रिलला त्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. यानंतर भाजपने महाविकास आघाडी सरकारविरोधात मोहीम उघडली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याची ओरड करीत सोमय्या यांच्यासह आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, आमदार पराग शाह, आमदार राहुल नार्वेकर आणि भाजपचे महापालिका नेते विनोद मिश्रा यांनी केंद्रीय गृहसचिवांची भेट घेऊन तक्रार दिली.

Kirit Somaiya latest Marathi news
महिला पोलिसाशी गैरवर्तन भोवलं; काँग्रेस आमदाराला न्यायालयाचा दणका

राणा दांपत्याला अटक केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. राणा दांपत्याला 23 एप्रिलला खार पोलीस ठाण्यात भेटायला गेलेल्या सोमय्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. विशेष म्हणजे, सोमय्यांना झेड प्लस सुरक्षा असतानाही हा हल्ला झाला होता. सोमय्या हे यात किरकोळ जखमी झाले आहेत. सोमय्यांनी या प्रकरणी शिवसैनिकांकडे बोट दाखवलं आहे. तर सोमय्यांनी अंगावर गाडी घातल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Marketing Minister Jaykumar Rawal assumes charge as chairman of the newly constituted high-level board of Mumbai APMC after its elevation to National Market status.
Rajya Sabha Bypoll Maharashtra | Navneet Rana | NCP Seat
Aniket Tatkare meets Sunetra Pawar and senior NCP leaders after being elected unopposed to the Maharashtra Legislative Council.
Navi Mumbai crime
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com