नॉटरिचेबल एकनाथ शिंदे गुजरातमध्ये

Eknath Shinde latest news | राज्यातील इतर शिवसेनेचे आमदारही त्यांच्यासोबत असण्याची शक्यता
Eknath Shinde latest Marathi news
Eknath Shinde latest Marathi news
Published on
Updated on

मुंबई : राज्यात शिवसेनेत फुट पडत असल्याची चर्चा जोरात सुरू असताना आता नॉट रिचेबल असणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे हे गुजरातमध्ये असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. एकनाथ शिंदे हे 11 आमदारांसह सूरतमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी रात्री उशिरा भाजपच्या एका नेत्यासोबत बैठक घेतली असल्याचे म्हटले जात आहे. (Eknath Shinde Latest News)

मध्यरात्री शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत 13 आमदार अनुपस्थित होते. त्यानंतर शिवसेनेच्या गोटातील चिंता आणखी वाढली आहे. या घडामोडींमुळे मंत्री छगन भुजबळ नाशिकमधील सर्व कार्यक्रम रद्द करुन मुंबईकडे रवाना झाले आहेत.

Eknath Shinde latest Marathi news
देवेंद्र फडणवीसांनी करुन दाखवलं : महाविकास आघाडीवर पुन्हा जोरदार मात

एकनाथ शिंदे यांच्यासोबत बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे आणखी दोन आमदार नॉट रीचेबल आहेत. बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड व मेहेकर संजय रायमूलकर हे सोबत असण्याची शक्यता आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांच्या सोबत नॉट रीचेबल असलेल्या आमदारांमध्ये पालघरमधील श्रीनिवास वणगा यांचाही समावेश असल्याची शक्यता आहे. पालघर विधासभेचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा हे देखील रात्रीपासून नॉट रीचेबल आहेत.

विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला. त्यातच गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू असल्याची चर्चा होचती. आता विधान परिषद निवडणूक आटोपताच शिवसेनेचे जवळपास १७ आमदार नॉटरिचेबल असल्याचे बोलले जात आहे. याता संजय राठोज, संजय गायकवाड, श्रीनिवास वनगा, महेंद्र थोरवे, भरत घोगावले, महेश शिंदे,विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे नॉट रीचेबल आहेत.यात मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आमदारांचा समावेश आहे.

मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात गेल्या काही दिवसांपासून नाराजीनाट्य सुरू होते. आमदार संजय राठोड यांनाही पुन्हा मंत्रीमंडळात संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना केवळ आश्वासन मिळत आहे. त्यामुळे आमदार राठोड नाराज होते. राठोड हे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे मानले जातात. शिवसेनेचे नेते गायब झाल्याने नवीन राजकीय समीकरण जुळून येण्याची चिन्हे आहेत. या धक्कातंत्राने भारतीय जनता पक्ष आपल्या सत्ता स्थापन करण्याच्या हेतूत यशस्वी होऊ शकते, अशीही चर्चा रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com