Parth Pawar: आता पार्थ पवारही अडकणार लग्नबंधनात! आत्या सुप्रिया सुळेंकडून मिळालं कन्फर्मेशन; कोण आहे पवार कुटुंबाची नवी सून?

Parth Pawar: शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये आता नव्या पिढीच्या लग्नाच्या बातम्या यायला लागल्या आहेत. नुकतंच सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न पार पडलं त्यानंतर आता अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवारांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.
Parth Pawar_Kaynat Dhar
Parth Pawar_Kaynat Dhar
Published on
Updated on

Parth Pawar: शरद पवार यांच्या कुटुंबामध्ये एकामागून एक नव्या पिढीच्या लग्नाच्या बातम्या यायला लागल्या आहेत. नुकतंच खासदार सुप्रिया सुळेंच्या मुलीचं लग्न पार पडलं त्यानंतर आता दिवंगत नेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव राज्यसभेचे खासदार पार्थ पवारांच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे. पार्थ पवार हे लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याचं कन्फर्मेशन खुद्द त्यांची आत्या सुप्रिया सुळे यांनी दिलं आहे. त्याचबरोबर पवार कुटुंबियांसाठी आणखी एक गोड बातमी असल्याचंही त्यांनी सूचकपणे सांगितलं आहे.

Parth Pawar_Kaynat Dhar
Moshi Incident: ७४ तास उलटले तरी मोशी इमारत दुर्घटनेत ७ जण अडकलेलेच! नातेवाईकांचा आक्रोश, दोघांचा मृत्यू; प्रशासनाचं नेमकं काय सुरुए?

पवार कुटुंबात गेल्या आठ महिन्यांत नव्या पिढीतल्या तीन जणांची लग्न पार पडली. यामध्ये अजित पवारांचे मोठे बंधु श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांचं ३० नोव्हेंबर २०२५ रोजी तनिष्का कुलकर्णी यांच्यासोबत लग्न पार पडलं. मुंबईतील जिओ सेंटरमध्ये हा लग्न सोहळा पार पडला. त्यानंतर अजित पवारांचे धाकटे पुत्र जय पवार यांचा ५ डिसेंबर २०२५ रोजी ऋतुजा पाटील यांच्याशी विवाह झाला. हा लग्नसोहळा बहारिनमध्ये डेस्टिनेशन वेडिंग सोहळा होता. ४ ते ७ डिसेंबर असा तीन दिवस हा सोहळा झाला. त्यानंतर सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह २० जून २०२६ रोजी सारंग लखानी यांच्याशी झाला. मुंबईतील जिओ गार्डन इथं हा मुख्य लग्नाचा सोहळा पार पडला त्यानंतर नागपूर, मुंबई आणि पुण्यात त्यांचं रिसेप्शनही पार पडलं.

सुप्रिया सुळेंचं कन्फर्मेशन

सुप्रिया सुळे यांनी म्हटलं की, "आमच्याकडं सध्या लग्न सुरु आहेत. पहिल्यांदा युगेंद्र त्यानंतर जय मग रेवती आणि आता पार्थचं आहे. पवारांच्या मुलांनी ठरवलं आहे की, यंदा बँड वाजवायचा आहे. अजून एक गोड बातमी आहे. ती तुम्हाला लवकच कळेल"

Parth Pawar_Kaynat Dhar
Arbaz Shaikh: सैराट फेम सल्याच्या भावनिक व्हिडिओची एकनाथ शिंदेंनी घेतली दखल; वडिलांसाठी दिला मदतीचा हात

नव्या सुनबाई कोण?

सुप्रिया सुळे यांच्या या माहितीवरुन आता पार्थ पवार हे देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत, हे आता निश्चित झालं आहे. पण त्यांचा लग्नसोहळा कधी असेल हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. पण येत्या २९ जुलै २०२६ रोजी पार्थ आणि अभिनेत्री-मॉडेल कायनात धार यांचा साखरपुडा पार पडणार आहे. कायनात धार हाय मुळच्या काश्मीरच्या असून सध्या दिल्ली आणि मुंबई इथं वास्तव्यास आहेत. पार्थ आणि कायनात हे दोघेही विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हाच पवार कुटुंबासोबत असलेल्या कायनात यांच्याबाबत चर्चा सुरु झाली होती. त्यानुसार त्या पवार कुटुंबाच्या सूनबाई असणार आहेत यावर आता अधिकृत शिक्कामोर्तब झालं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com