Pradeep Purnekar Case: मोठी बातमी: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा तपास भारताबाहेर; 'क्राईम ब्रँच'ची टीम नेपाळमध्ये तैनात

Thane Police Investigation : ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गेल्या आठवड्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर सात राऊंड फायर करतानाच त्यांच्यावर धारदार हत्यारांनी सपासप वार करत त्यांना संपवलं होतं.
Pradeep Purnekar .jpg
Pradeep Purnekar .jpgSarkarnama
Published on: 
Updated on: 

Thane News: ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पुर्णेकर यांची गेल्या आठवड्यात निर्घृण हत्या करण्यात आली होती. अज्ञात हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर सात राऊंड फायर करतानाच त्यांच्यावर धारदार हत्यारांनी सपासप वार करत त्यांना संपवलं होतं. याच हत्येप्रकरणात सुरु असलेल्या पोलिस तपासात दिवसागणिक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आता पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणाचा तपास आता भारताबाहेर पोहोचला आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखेने तपासाचा वेग वाढवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र-गोवा सीमेवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले दोन प्रमुख आरोपी निखिल यादव आणि नितेश पवार यांना बेड्या ठोकल्या आहेत.

तसेच हत्येचा कट रचल्याचा संशय असलेला आरोपी सुभाष उर्फ पप्या शिंदे यालाही अटक करण्यात आली आहे. तो सध्या पोलीस कोठडी 9 ऑक्टोबर 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,प्रदीप पूर्णेकर यांचा खून करण्यासाठी आरोपींनी महिनाभर आधीच कट रचला होता आणि पूर्णेकर यांच्या हालचालींवर पाळत ठेवून रीतसर मॉक ड्रिल देखील केले होते.

Pradeep Purnekar .jpg
Someshwar Election: 'सोमेश्वर'च्या प्रचारात सुनेत्रा पवारांची एन्ट्री; बंडखोर पुरुषोत्तम जगतापांच्या गावातच पहिली बैठक, बोलून दाखवली खंत

हल्लेखोरांनी वापरलेल्या दोन्ही दुचाकी (बाईक्स) पोलिसांनी समतानगर परिसरातून जप्त केल्या आहेत. तसेच हल्लेखोरांना हत्येनंतर पळून जाण्यासाठी एक चारचाकीही घटनास्थळापासून काही अंतरावर पोलिसांनी जप्त केली आहे.

ठाणे पोलिसांकडून आता मुख्य मारेकऱ्यांना अटक झाली असली, तरी अद्याप काही फरार आरोपींचा शोध सुरू आहे. ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथकाच्या मदतीने या फरार आरोपींच्या मागावर आहे. हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी गुन्हे शाखेची टीम नेपाळमध्ये तैनात करण्यात आली आहे.

Pradeep Purnekar .jpg
MLC Election : शरद लाडांची अवस्था ‘तेलही गेलं अन् तूपही गेलं’ : पुणे पदवीधरसाठी प्रचंड राबल्यानंतरही 'गेम' कुठे झाला?

प्रदीप पुर्णेकर हत्या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी ठाणे गुन्हे शाखेने तपासाचा वेग वाढवला आहे. फरार आरोपी परराज्यात किंवा परदेशात पळून जाऊ नयेत, यासाठी विविध ठिकाणी गुन्हे शाखेच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

विमानतळांसह महत्त्वाच्या ठिकाणी फरार आरोपींचे फोटो आणि माहिती पाठवण्यात आली असून, नेपाळमध्येही गुन्हे शाखेची टीम तैनात करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, फरार आरोपी सोनू कनोजिया उर्फ टल्ली हा पोलिसांच्या हाती कधी लागतो, याकडे आता लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com