Someshwar Election: 'सोमेश्वर'च्या प्रचारात सुनेत्रा पवारांची एन्ट्री; बंडखोर पुरुषोत्तम जगतापांच्या गावातच पहिली बैठक, बोलून दाखवली खंत

Someshwar Sugar Factory Election 2026 : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात करताना महत्त्वाची बाब म्हणजे स्वतंत्र पॅनेल उभं करणारे पुरुषोत्तम जगताप यांच्या वाणेवाडी गावातच पहिली सभा घेतली. या सभेत सुनेत्रा पवार यांनी सभासद शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.
Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory election
Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory electionSarkarnama
Published on: 
Updated on: 

Baramati News: बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीत आता राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी (ता.6 ऑक्टोबर) प्रचारात एन्ट्री घेतली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सोमेश्वर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रचाराला सुरुवात करताना महत्त्वाची बाब म्हणजे स्वतंत्र पॅनेल उभं करणारे पुरुषोत्तम जगताप यांच्या वाणेवाडी गावातच पहिली सभा घेतली. या सभेत सुनेत्रा पवार यांनी सभासद शेतकऱ्यांशी मनमोकळा संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबत विचारलेल्या प्रश्नावर भाष्य करणं टाळलं.मात्र,त्यांनी सोमेश्वरची निवडणूक ही बिनविरोध व्हायला हवी होती अशी खंतही बोलून दाखवली. खरंतर अजित पवार यांच्या निधनानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणूक चुरशीची होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.

सुनेत्रा पवार म्हणाल्या,अशा प्रसंगात निवडणूक होत असताना अशा गोष्टी घडाव्यात याचा कुणी स्वप्नात देखील विचार केला नव्हता. काही दिवसांपूर्वी आम्ही सर्व बंगल्यावर आलो होतो. तेव्हा आपण सगळे एकत्र आलो होतो. त्यावेळी प्रचाराच्या दृष्टीनं इथं असं यावं लागेल असं वाटलं नव्हतं.

Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory election
Maharashtra MLA Fund : आमदार निधीच्या खर्च नियमावलीत बदल, २५ लाखांचा निधी आता पाण्यावर खर्च करता येणार

सुनेत्रा पवारांनी यांनी यावेळी वाणेगावच्या सभासदांना भावनिक साद घातली. त्या म्हणाल्या, माझ्यापेक्षा सोमेश्वरचा इतिहास तुम्हांला चांगला माहिती आहे.तुम्ही सर्वजण त्याचे साक्षीदार आहात. तसेच अजितदादांचं सोमेश्वर साखर कारखान्यावर कुटुंबापेक्षा जास्त प्रेम होतं.आता आपल्याला यापुढचा विचार करावा लागणार आहे. आजपर्यंतचा सर्वात चांगला भाव मिळाला असला तरी महाराष्ट्रात अत्यंत भीषण दुष्काळ पडलेला आहे.

मराठवाड्यात अत्यंत वाईट अवस्था आहे.इकडं तसं पाणी असल्यामुळे तुम्हांला याची जाणीव आहे. तुम्हांला अत्यंत कमी कालावधी मिळाला असेल,असं वाटू शकते. पण एकंदरीत दुष्काळजन्य या परिस्थितीत शेतकरी तसेच आपल्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागणार आहे, तशीच अनेक तडजोडीही कराव्या लागणार आहे, येणारा काळ अवघड आहे,असंही पवार यांनी सांगितले.

Sunetra Pawar, Someshwar Sugar Factory election
Gokul election : गोकुळच्या पत्रकावरून महायुतीत ठिणगी; शौमिका महाडिकांचा हसन मुश्रीफांना टोला, महादेव जानकरांनाही सुनावलं

काहीच महिन्यांपूर्वी माळेगावची निवडणूक झाली.तुम्हांला सर्वांना असं वाटत असेल की, मला फारच कमी अनुभव आहे. तसा मला राजकीय अनुभव कमी असेलही, पण मी नवखी नाही. दादा अलीकडेच माळेगावचे चेअरमन असले तरी गेली अनेक वर्षे बरेच कारखाने तेच बघत होते. अनेक कारखान्यांच्या चेअरमन आणि एमडीला माहिती नसतील इतक्या गोष्टींना दादांना माहिती असायच्या असंही सुनेत्रा पवार यांनी म्हटलं.

त्यामुळे मी एवढंच सांगेन की, सोमेश्वर साखर कारखाना कोणाच्या ताब्यात द्यायचा,आपलं भविष्य कुणाच्या हाती द्यायचंय याचा विचार तुम्हांला या निवडणुकीच्या निमित्तानं करायचा आहे,असंही सुनेत्रा पवार सांगितलं. त्यांनी यावेळी महाराष्ट्रातच नव्हे,तर भारतात ऊसाला चांगला भाव मिळाल्यानंतर आणि सर्व शेतकरी समाधानी झाल्यानंतर ही निवडणूक बिनविरोधच व्हायला हवी होती, ही माझीच नाही तर आपल्या सगळ्यांची भावना अशीच असल्याचंही पवार यांनी यावेळी म्हटलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com