Loksabha Election 2024 : गुढीपाडव्याला जाहीर सभा घेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीतील आपली भूमिका स्पष्ट केली. नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठींबा देण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. महायुतीतून mahayuti राज ठाकरेंच्या या निर्णयाचे स्वागत होत असताना मात्र मनसेतीलच कार्यकर्ते यावर नाराजी व्यक्त करत आहेत. मनसे सरचिटणीस किर्ती कुमार शिंदे यांना राजीनामा देत राज यांच्या भूमिकेवर जाहीर नाराजी व्यक्त केली. राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्यांवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
'कार्यकर्त्यांनी राजीनामा दिला. त्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) काय करणार? मत वेगळी असली तरी पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावीत, असं मला वाटत नाही. राजीनामे दिलेले कार्यकर्ते काय महत्त्वाचे लोक नाहीत.' अशी सारवासारव प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी केली.
तसेच राज ठाकरे सतत भूमिका बदलत असतात, या होणाऱ्या टीकेला महाजन यांनी उत्तर दिले आहे. काही भूमिका सतत बदलत असतात. मात्र, आमची हिंदुत्वाची आणि महाराष्ट्रासाठीची भूमिका कधीच बदलली नाही. फायद्यासाठी राज ठाकरे कोणाशी नाते जोडत नाही, असे महाजन म्हणाले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीला दिलेला पाठींबा हा राज ठाकरे यांचा निर्णय विचारपूर्वक हिंदुत्व आणि देशाची प्रगती लक्षात घेऊन हा निर्णय घेतला आहे. या देशाचं हित महत्त्वाचे आहे. 370 कलम रद्द झाल्यावर राज ठाकरे यांनी मोठा मोर्चा काढला.राम मंदिर झाले हे देशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, असे म्हणत महाजन यांनी राज ठाकरे यांच्या बिनशर्त पाठींब्याचे समर्थन केले.
राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा दिला आहे. मात्र, महायुतीच्या प्रचारात सहभाही व्हायचे की नाही याचा निर्णय अजून झालेला नाही. 13 एप्रिलला राज ठाकरे बैठक घेणार आहेत. त्या बैठकीत या विषयी निर्णय घेण्यात येईल, असे प्रकाश महाजन यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.