RTO Corruption : मंत्र्यांकडे आरटीओतील गैरकारभाराच्या क्लिप्स; महिला IPS अधिकारी रॅकेट उध्वस्त करणार, विधानसभेत निघाला मुद्दा...

Pratap Sarnaik news, IPS Priyanka Narnaware : IPS नारनवरे या सध्या राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
IPS Priyanka Narnaware
IPS Priyanka NarnawareSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly update : राज्याच्या मोटार वाहन विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांविरोधातील भ्रष्टाचाराच्या तक्रारी अजूनही कमी झालेल्या नाहीत. प्रामुख्याने प्रादेशिक परिवहन कार्यालये म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचा आरोप सातत्याने होत असतो. विशेष म्हणजे या विभागाचे मंत्रीही ते मान्य करतात. अशाच काही ध्वनिचित्रफिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडेही आल्या आहेत.

सरनाईक यांनी मंगळवारी विधानसभेत याबाबत माहिती दिली. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आरटीओतील गैरकारभाराबाबत प्रश्न उपस्थित केला होता. आरटीओ विभागासंदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारी, ध्वनिचित्रफिती आणि अन्य आरोपांची स्वतंत्र चौकशी करण्यासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे.

IPS नारनवरे या सध्या राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये अतिरिक्त परिवहन आयुक्त रवी गायकवाड आणि दक्षता अधिकारी मंदार जावळे यांचा समावेश आहे. या समितीला एका महिन्याच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले.

IPS Priyanka Narnaware
Cabinet reshuffle : मंत्रिमंडळ फेरबदलाआधी दिल्लीत घडामोडींना वेग; मातब्बर केंद्रीय मंत्र्यांच्या तीन खाजगी सचिवांना तडकाफडकी हटविले

चौकशीत दोषी आढळणाऱ्या प्रत्येकावर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असे सांगत सरनाईक म्हणाले, राज्यातील वाहन नोंदणीतील करचुकवेगिरी, आरटीओ विभागातील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या तक्रारींची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधित प्रकरणांबाबत आर्थिक गुन्हे शाखेकडे (EOW) तक्रार दाखल करण्यात आली असून, चौकशी सुरू आहे.

IPS Priyanka Narnaware
Supriya Sule news : जयंत पाटील-विनोद तावडे गुप्त बैठक? सुप्रिया सुळे म्हणाल्या, माझ्याही तावडेंसोबत महिनाभरात 20 बैठका...

प्राथमिक स्तरावर आवश्यक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. संबंधित अधिकाऱ्यांविरोधात आवश्यकतेनुसार कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. परिवहन विभागात करचुकवेगिरी, भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांना कोणतीही मुभा दिली जाणार नाही, असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com