

Union minister news : केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मोठा फेरबदल होणार असल्याची जोरदार चर्चा दिल्लीत सुरू आहे. या फेरबदलामध्ये काही मोठ्या खात्यांमध्ये फेरबदल होऊ शकतो. तर काही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढले जाऊ शकते, असेही तर्कवितर्क लढविले जात आहेत. या चर्चा झडत असताना केंद्रीय मंत्र्यांनी खासगी सचिवांना हटविल्याच्या बातमी खळबळ उडाली आहे.
केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी त्यांच्या खासगी सचिवासह दोन अतिरिक्त खासगी सचिवांना कार्यालयातून हटविले आहे. यादव यांच्या कार्यालयाने स्वतंत्रपणे याबाबतचा आदेश ३ जुलैला काढल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे अचानक तीन सचिवांना हटविण्याचा हा प्रशासकीय निर्णय दुर्मिळ असल्याची चर्चा आहे.
'इंडियन एक्सप्रेस'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यानुसार संबंधित तीन अधिकाऱ्यांना तातडीने त्यांच्या मूळ केडरमध्ये परत पाठविण्यात आले आहे की त्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मंत्रिमंडळातील फेरबदलाची चर्चा सुरू असतानाच ही घडमोड घडल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.
प्रामुख्याने एखाद्या मंत्र्यांच्या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी आणि त्यातही खासगी सचिवांना बदलण्याची प्रक्रिया ही मंत्रिमंडळ फेरबदलाच्या कालावधीत होते. अनेकदा नवे मंत्री त्यांच्या मर्जीप्रमाणे अधिकाऱ्यांची नियुक्ती करत असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे यादव यांच्या कार्यालयात झालेले हे फेरबदलाचा नेमका अर्थ काय, अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
कुणाला हटविले?
IRS अधिकारी अमर सिंग हे यादव यांचे २०२१ पासून खाजगी सचिव होते. त्यांचा कार्यकाळ ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत होता. पण त्याआधीच त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश मंत्रालयाने काढले आहे. अतिरिक्त खाजगी सचिव शैलेश कुमार सिंग आणि आयुष सारण यांना पदमुक्त करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.