Assembly Session : ‘पृथ्वीराजबाबा, आपण फार हुशार आहात’; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Devendra Fadnavis Vs Prithviraj Chavan : आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा सहावा क्रमांक आहे, अशी चुकीची माहिती दिलीआहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा क्रमांक सहावा नाही, तर अकरावा आहे. ही माहिती मोदी यांच्या प्रेस नोटमधील माहिती आहे.
Devendra Fadnavis-Prithviraj chavan-Ajit Pawar
Devendra Fadnavis-Prithviraj chavan-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 02 July : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आर्थिक पाहणी अहवालातील त्रुटीवर बोट ठेवून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. आर्थिक पाहणी अहवालात दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र सहाव्या नव्हे तर अकराव्या क्रमांकावर आहे, हे नरेंद्र मोदी यांच्या प्रेस नोटमधील माहिती आहे. ते आपल्यासाठी भूषणावह नाही, जरा बघा देवेंद्रजी आणि अजितदादा, असे म्हणत सरकारला धारेवर धरले. चव्हाण मोदींच्या प्रेस नोटमधील माहिती देत मर्मावर बोट ठेवल्याने अस्वस्थ झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पृथ्वीराजबाबा, आपण फार हुशार आहात,’ असे म्हणत उत्तर दिले.

पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj chavan) यांनी आर्थिक पाहणी अहवालात चुकीची माहिती देण्यात आली आहे, त्यात मी दुरुस्ती करू इच्छितो. तुम्ही सांगता की महाराष्ट्राची (Maharashtra) अर्थव्यवस्था सहाव्या क्रमांकावर गेली आहे. दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राचा क्रमांक सहावा आहे. पण, दरडोई उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक सहावा नाही, तर अकरावा आहे. ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रेस नोटमधील माहिती आहे.

खरं सांगा आपण अकराव्या क्रमांकावर गेलो असेल तर का गेलो. ते सुधारण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करूयात. ते फक्त सरकारचे काम नाही तर आपल्या सर्वांचे काम आहे. आपण कुठे आहोत, हे मान्य केल्याशिवाय आपल्याला दुरुस्त करता येणार नाही. आपल्यापुढं अनेक राज्ये आहेत आणि ते काही भूषणावह नाही, असा चिमटाही चव्हाण यांनी सरकारला घेतला.

केरळ, पाँडेच्चरी, उत्तराखंड, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, कर्नाटका, हरियाणा, दिल्ली, सिक्किम ही सर्व आपल्यापुढं आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा बघा आपण हे. यात दिल्ली, सिक्किम ही छोटी राज्ये आहेत, असे तुम्ही म्हणू नका, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारला सुनावले.

पृथ्वीराज चव्हाण यांनी नरेंद्र मोदी यांच्या प्रेस नोटमधील माहिती देत मर्मावर बोट ठेवल्याने काहीसे अस्वस्थ झालेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी त्यांना उत्तर दिले. पृथ्वीराजबाबा, आपण फार हुशार आहात. राज्यांचं बंचिंग कसं होतं, हे आपल्याला माहिती आहे. छोटी राज्ये-मोठी राज्ये आपण वेगवेगळी करतो.

आपलं महाविकास आघाडीचं सरकारच्या काळात बघा. महाविकास आघाडी सरकारच्या २०२०-२१, २०२१-२२ काळात दरडोई उत्पन्नात जो क्रमांक होता, तोच क्रमांक आताही आहे. फडणवीस बोलत असतानाच यशोमती ठाकूर यांनी ‘त्या वेळी कोविड होता,’ असा मुद्दा मांडला. त्यावर ‘ताई तुम्ही कोविडचं म्हणता.

दरडोई उत्पन्न कसं निघतं. जीएसडीपीला लोकसंख्येने गुणतात. ज्या वर्षी दुष्काळ असतो, त्यावेळी शेतीचा ग्रोथरेट मागे जातो. त्या वर्षी तुमचं सकल उत्पन्न कमी असतं. त्याला जर तुम्ही लोकसंख्येने गुणलं, तर दरडोई उत्पन्न कमी येतं, असेही फडणवीसांनी समजावले.

दरडोई उत्पन्नात आपला अकरावा क्रमांकच नाही. मी तुम्हाला माहिती देतो. माझ्याकडची माहिती तुम्हाला देतो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हणताच ‘पाठवा तुमच्याकडची माहिती. तुमच्याकडची माहिती मला पाठवा, मी त्याची सर्व माहिती तुम्हाला देतो, असे उत्तर फडणवीस यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com