Prakash Ambedkar: राज-उद्धव एकत्र आल्यानंतर आता रिपब्लिकन ऐक्य...; आंबेडकरांनी नेमके काय दिलेत संकेत?

Prakash Ambedkar: मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले आहेत. यानंतर आता बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या आणखी एका ऐक्याची चर्चा आता सुरु झाली आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
Published on
Updated on

Prakash Ambedkar: मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन राज आणि उद्धव ठाकरे हे दोघे बंधू एकत्र आले आहेत. यानंतर आता बऱ्याच काळापासून सुरु असलेल्या आणखी एका ऐक्याची चर्चा आता सुरु झाली आहे. हे ऐक्य म्हणजे रिपब्लिकन पक्षांचं ऐक्य! यापार्श्वभूमीवर ठाकरेंबंधुंच्या ऐक्यापासून रिपब्लिकन ऐक्याबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. साम टीव्हीशी बोलताना त्यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली.

Prakash Ambedkar
Aditi Tatkare : नंदुरबारचा अंगणवाडी घोटाळा विधानसभेत गाजला; मंत्री आदिती तटकरेंना सत्ताधारी आमदारांनीच घेरलं

महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून दोन्ही ठाकरे बंधू एकत्र जरी आले असले तरी ते निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच एकत्र आले आहेत. दुसरीकडं रिपब्लिकन पक्षांचा प्रश्न आता अस्तित्वातच राहिला नसून त्यांच्या ऐक्याचा देखील प्रश्न आता उपस्थित करू नये. आरएसएसनं मातृभाषेतून शिक्षणाचा केलेलं समर्थन ही फार वेगळी गोष्ट नाही. पहिल्या पाच इयत्तापर्यंत मुलांना मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण दिले गेलं पाहिजे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मांडली आहे.

Prakash Ambedkar
Success Story : 23व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक! अन् आता हे IPS अधिकारी बनले 'फिटनेस आयकॉन'

दरम्यान, रिपब्लिकन ऐक्याचे महाराष्ट्रात फार पूर्वीपासूनच अनेकदा प्रयत्न झाले, हे ऐक्य झालंही पण ते जास्तकाळ काही टिकू शकलं नाही. आता सध्याच्या घडीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्षच काही प्रमाणात आपला प्रभाव टिकवून आहे. इतर गटांची तर चर्चाही कधी ऐकायला मिळत नाही. त्यातच प्रकाश आंबेडकरांनी आता वंचित या नावानं आंबेडकरी राजकारणाला वेगळं रुप देण्याचा प्रयत्न केला आहे.

पण तरीही त्यांचा पक्ष आणि चळवळ ही प्रामुख्यानं घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनीच सुरु असल्यानं रिपब्लिकन पक्षांमध्ये आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाचाही विचार केला जातो. नुकतेच आठवलेंनी पुन्हा एकदा प्रकाश आंबेडकरांना ऐक्यासाठी साद घालण्याचा प्रयत्न केला. ऐक्यानंतर पक्षाची संपूर्ण धुरा तुम्ही सांभाळा अशी भूमिकाही घेतली. पण आठवलेंना आंबेडकर जुळवून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. अद्यापही त्यांचा आठवलेंना कडवा विरोध कायम आहे.

Prakash Ambedkar
Nagpur Shiv SenaUBT : सतीश हरडे यांची नागपुरात एंट्री, शिवसेना ठाकरे सेनेने दिले कार्यकारिणी बदलाचे संकेत

त्याचमुळं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील कडवा विरोध विरघळून आता किमान ते कुठल्या का होईना पण मुद्द्यावर एकत्र आलेले असताना रिपब्लिकन नेत्यांमध्ये देखील असंच काहीसं घडेल अशी आशा त्यांच्या मतदारांना आहे. त्याचबरोबर खरोखरचं ठाकरेंबंधूसारखं रिपब्लिकन ऐक्यही महाराष्ट्रात घडून आलं तर राज्याचं राजकारण वेगळ्याचं वळणावर जाऊ शकतं, असंही काही जाणकार मंडळी सांगतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com