Raj Thackeray Video : मुंबईचा महापौर हिंदू की मराठी? राज ठाकरेंनी थेट पेशवे काळातील संदर्भ दिला

Raj Thackeray BMC Election : आम्ही हिंदू आहोत हिंदी नाहीत. या शहरात मराठीच महापौर होणार, असे राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray, Uddhav Thackeray
Raj Thackeray, Uddhav Thackeraysarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray News : मुंबई महापालिका निवडणुकीत महापौर मराठी की हिंदू असा थेट सामाना भाजप आणि ठाकरे बंधूंमध्ये सुरू आहे. मुंबईचा महापौर हिंदू होईल,असे भाजप सांगत आहे तर, मुंबईचा महापौर मराठीच होणार, असे ठाकरे बंधू म्हणत आहेत. दरम्यान, आज पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरेंनी यावर थेट पेशवे काळाचा संदर्भ दिला.

राज ठाकरेंना मुंबईच्या महापौर मराठी की हिंदू असा प्रश्न पत्रकारांनी केला असता ते म्हणाले, 'पेशवेकाळात मराठी सत्तेचे केंद्र बडोदा,इंदूर येथे उभे राहिले. आता बडोद्याचा महापौर मराठी होतो का? बडोद्याचे सर्व महापौर गुजरातीच होतात ना. तसं महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील महापौर मराठीच होणार. इथे कसलं मराठी, हिंदू करतात?'

'आम्ही हिंदू आहोत हिंदी नाहीत. या शहरात मराठीच महापौर होणार, आमचाच महापौर होणार.', असे देखील राज यांनी सांगितले. उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका करताना म्हटले की, भाजप मराठी माणसाला हिंदू समज नाहीत का?

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Rahul Narvekar controversy : राहुल नार्वेकरांची अडचण वाढली, उद्धव ठाकरेंनी थेट मुद्याला हात घातला; विधानसभा अध्यक्षपद जाणार?

मुंबईकर शब्द का वापरले?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेचा एकत्रित जाहीरनामा आज प्रसिद्ध करण्यात आला. त्या जाहीरनाम्यात मराठी माणूस ऐवजी मुंबईकर शब्द वापरण्यात आला आहे. त्यावर राज ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले की,जाहीरनामा हा निवडणूक आयोगाला सादर करावा लागते. मराठी माणूस शब्द वापरला असता तर तो मंजुर केला नसता. त्यामुळे मुंबईकर हा शब्द वापरला आहे.

Raj Thackeray, Uddhav Thackeray
Nashik municipal election : महापालिकेतील एबी फॉर्मच्या गोंधळाबाबत गिरीश महाजनांचे कानावर हात; म्हणाले, 'मुख्यमंत्र्यांशी बोलू...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com