Raj Thackeray : राज ठाकरे यांना मारण्याची सुपारी शिवसेनेने दिली होती : देशपांडेंचा खळबळजनक आरोप!

Raj Thackeray : नाव नारायण राणेंवर यावा म्हणून मालवणमध्ये घातपात घडवण्याचा प्रयत्न..
Raj Thackeray
Raj ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Raj Thackeray : “शिवसैनिक यांच्या माध्यमातूनच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना थेट जीवे मारण्याची सुपारी दिली गेली होती.”, असा मोठा आणि खळबळजनक दावा मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. या दाव्यावर एकच चर्चा सुरू झाली आहे.

Raj Thackeray
Indapur News : राष्ट्रवादीला उच्चांकी मतदान देणाऱ्या गडाला भाजपकडून सुरूंग : हर्षवर्धन पाटील, राम शिंदेंचे इंदापुरात धक्कातंत्र

“मुंबईतल्याच गुंडांकडे शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनच राज ठाकरेंना जीवे मारण्याची सुपारी दिली गेली होती. कोकणच्या मालवण इथे राज ठाकरे यांचं घातपात घडवण्याचं षडयंत्र रचण्याचा त्यांचा डाव होता. या षडयंत्रातून याचं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं नाव पुढं यांवं यासाठीच हा घातपात मालवण या ठिकाणी अशा पद्धतीच्या घातपाताचं षडयंत्र रचलं जाणार होतं.आपल्या प्रतिस्पर्ध्याचा काटा काढायचा, अशा प्रकारचं नीच पद्धतीचं राजकारण झालं होतं, असा खळबळजनक आरोप संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर लावले आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

Raj Thackeray
Maharashtra Politics : 2024 मध्ये तुम्हीच मुख्यमंत्री होणार का? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं...

"1988 मध्ये ज्यावेळी राज ठाकरे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करत होते, विद्यार्थी सेना चालवत होते, तेव्हा उद्धव ठाकरे हे छायाचित्र काढत होते. जाहीरातीच्या एजन्सीचं काम चालवत होते. 1995 या वर्षी या एकाच वर्षी राज ठाकरे यांनी पक्षासाठी एकूण 80 सभा घेतल्या होत्या.सलग तीन महिने राज ठाकरे हे पक्षासाठी सभा घेत फिरत होते. जेव्हा 1995 मध्ये शिवसेना-भाजप युतीची राज्यात सत्ता आली, तेव्हा उद्धव ठाकरे यांना सत्तेचे स्वप्न पडत होते.मुख्यमंत्री पदाची स्वप्ने उद्धव ठाकरेंना पडायला लागली," असाही दावा देशपांडे यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com