Adinath Shastri Maharaj Health Update : ‘मी ठीक आहे’, आदिनाथ शास्त्री महाराज; बोलतात पण कारण गुप्त, अनुयायांना दिला संदेश

Mahant Adinath Shastri Maharaj, the head of Tarakeshwar Gad in Ashti (Beed), is undergoing treatment in a hospital in Ahilyanagar after sustaining serious injuries : बीड जिल्ह्यातील तारकेश्वर गडाचे मठाधीपती महंत आदिनाथ शास्त्री महाराज यांच्या प्रकृतीबाबत आणि त्यांनी अनुयायींना संदेश दिला आहे.
Mahant Adinath Shastri Maharaj
Mahant Adinath Shastri MaharajSarkarnama
Published on
Updated on

Tarkeshwar Gad Mahant injured : बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र तारकेश्वर गडाचे मठाधीपती महंत आदिनाथ महाराज शास्त्री काल रात्री अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात जखमी अवस्थेत दाखल झाले.

हिंदुत्वाचे (Hindutva) प्रखर प्रचारक, अशी आदिनाथ महाराज शास्त्री यांची प्रतिमा आहेत. त्यामुळे ते जखमी अवस्थेत अहिल्यानगर शहरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर त्यांच्याविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. यातच उपरानंतर आदिनाथ शास्त्री महाराज यांनीचा व्हिडिओद्वारे अनुयायींना, लवकरच गडाच्या सेवत येत आहे, संदेश दिला. परंतु जखमी होण्यामागील कारणांना बगल दिला.

उपचारानंतर आदिनाथ शास्त्री महाराज यांनी अनुयायींना व्हिडिओद्वारे संदेश पाठविताना, त्याची सुरवात जय श्रीराम याने केली. 'माझी तब्येत एकदम व्यवस्थित आहे. कोणी काही काळजी करू नका. मी लवकरात लवकर गडावर येणार आहे. जय श्रीराम,' असे म्हटले.

आदिनाथ शास्त्री महाराजांना जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी अहिल्यानगर शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर चर्चांना उधाण आहे. त्यांच्या अनुयायींनी रुग्णालयात धाव घेतली. भाजप (BJP) आमदार मोनिक राजळे, युवा पदाधिकारी अक्षय कर्डिले यांनी रुग्णालयात जात विचारणा केली.

Mahant Adinath Shastri Maharaj
Yashwant Thorat Case : वारकरी संप्रदाय हादरला! कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड; मुलीचं चार वर्षे शोषण, अमानुष छळ, चटके देत अत्याचार

अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी देखील त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. तसंच अहिल्यानगर शहरातील भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी यांनी देखील रुग्णालयात धाव घेतली होती.

Mahant Adinath Shastri Maharaj
Ahilyanagar Crime News: अहिल्यानगर हादरलं! तारकेश्वर गडाच्या महंतांचे स्वत:वरच वार; रुग्णालयात उपचार सुरू,भाजप आमदार दाखल

महाराजांवर शस्त्रक्रिया

आदिनाथ शास्त्री महाराज यांनी उपचारानंतर प्रकृती स्थिर आहे. ब्लड प्रेशराचा काहीसा त्रास असल्याची वैद्यकीय सूत्रांची माहिती आहे. त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यकीय अधिकारी यांनी, महाराजांची सुरवातीला प्रकृती गंभीर होती. अपघाताची जखम होती. त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली असून, प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.

महाराजांनी कारण सांगणं टाळलं...

आदिनाथ शास्त्री महाराज यांच्याबाबत नेमकं काय झालं? अपघाती जखम नेमकी काय होती? याबाबत त्यांच्या अनुयायींसह राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. अनुयायींना, लवकर गडावर येत आहे, असे महाराजांनी सांगितले असले तरी, झालेल्या प्रकारावर त्यांनी भाष्य केलेले नाही. त्यामुळे चर्चांना अधिकच पेव फुटलं आहे.

घटनेवर कोणी भाष्य करेना...

जबाबदारी घेत, कोणीही भाष्य करायला तयार नसून, महाराजच पुढील काही दिवसांत बोलतील, असे सांगितलं जात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्ताने देवगड (ता. नेवासा) इथं आदिनाथ शास्त्री महाराज सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी तिसऱ्या अपत्याला मतदानाचा अधिकार नको, अशी थेट भूमिका मांडली होती. त्यांची ही भूमिका राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com