Rohit Pawar News : रोहित पवारांनी मागणी केली फडणवीसांकडे पण, पूर्ण केली अजितदादांनी!

Rohit Pawar On Ajit Pawar : महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार.
Rohit Pawar
Rohit Pawar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai News : स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या तरूणांची खूप मोठी संख्या राज्यभरात आहे. राज्यातील लाखो विद्यार्थी दरवर्षी स्पर्धा परिक्षा देत असतात. मात्र या परिक्षेसाठी मोठे शुल्क आकारून राज्य सरकार खाजगी कंपन्यांच्या तुंबड्या भरत आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत होता. परिक्षा शुल्क प्रमाणापेक्षा अधिक असल्याचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी लावला. यामुळे स्पर्धा परिक्षा शुल्काचा मुद्दा चर्चेत आहे. (Latest Marathi News)

Rohit Pawar
Mumbra Corporators News: अजित पवारांसोबत मुंब्य्रातील १२ नगरसेवकांची 'दावत'; आव्हाडांना दुसरा झटका

"राज्य सरकारच्या सहकार विभागाच्या दोन वेगवेगळ्या पदांसाठी एकच आणि एकत्रित परीक्षेचे नियोजन आहे, मग यासाठी दोन पदांच्या परीक्षा शुल्क भेद का? एकासाठी १००० रूपये आणि दुसऱ्यापदासाठी २००० रूपये एवढे का? ही विद्यार्थ्यांची लूट आहे, अशा आशयाचं ट्वीट रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) टॅग केलं होतं. मात्र रोहित पवारांनी (Rohit Pawar) उचललेल्या या मुद्द्याची दखल दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) घेतली आहे. अजित पवारांनी यांनी यासंदर्भात काही सूचना दिल्याची माहिती दिली आहे.

"राज्य शासनाच्या वतीने काढलेल्या पदभरती जाहिरातींमध्ये प्रत्येक पदासाठी वेगवेगळी शुल्क आकारल्याचे समोर आले आहे. ही बाब सबंधित विद्यार्थ्यांवर अन्या. करणारी आहे. सर्व पदासांठी एकच शुल्क असावे, अशा सूचना अशा सूचना देण्यात आले आहेत," अशी माहिती अजित पवारांनी सांगितली आहे.

रोहित पवारांनी मानले आभार :

"एकाच जाहिरातीतल्या वेगवेगळ्या, पदांसाठी वेगवेगळी फी न आकारता एकच फी आकारण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक आभार. सरळसेवा भरतीसाठी असलेली 1000 रु फी विद्यार्थ्यांना परवडणारी नाही, त्यामुळे UPSC प्रमाणे 100 रु फी किंवा MPSC प्रमाणे किमान फी आकारणे गरजेचे आहे.राजस्थान सरकार प्रमाणे 'वन टाईम

Rohit Pawar
NCP Whip To MP : अग्निपरीक्षा ! राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून 'व्हीप' जारी; पाचही खासदारांमध्ये संभ्रम
Rohit Pawar
Sharad Pawar - Rahul Gandhi : दिल्लीत मोठी राजकीय घडामोड, मोदींच्या भाषणापूर्वीच शरद पवार- राहुल गांधींमध्ये महत्वाची बैठक

रजिस्ट्रेशन सिस्टीम' केल्यास विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो.अधिवेशन काळात आपणास भेटून आपण यासंदर्भात चर्चा देखील केली आहे. परीक्षा पारदर्शक होत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी असून परीक्षा पारदर्शकपणे पार पाडाव्यात यासाठी देखील आवश्यक त्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. परीक्षा फी कमी करणे आणि पारदर्शकता यांसदर्भात देखील आपण निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा ही विनंती, अशा शब्दात रोहित पवारांनी आभार मानले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com