RSS Centenary Event : 'ज्याने भारतावर बॉम्बिंग केलं त्याचा मुलगा सरसंघचालकांसोबत, संघाचं चारित्र्य किती बिघडलेलं...'; 'त्या' फोटोवरून राऊतांचा 'RSS'वर हल्लाबोल

Sanjay Raut Slams RSS : "संघाच्या कार्यक्रमात अनेक सिने कलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रांतले मान्यवर उपस्थित होते. त्यातल्या काही लोकांना पाहून आम्हाला भाजप आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल धक्का बसला. किती ढोंग आणि पाखंड आहे? आम्ही पाहिलं गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करतोय."
RSS Chief Mohan Bhagwat at the RSS Centenary event in Mumbai alongside prominent celebrities, sparking political reactions from leaders like Sanjay Raut.
RSS Chief Mohan Bhagwat at the RSS Centenary event in Mumbai alongside prominent celebrities, sparking political reactions from leaders like Sanjay Raut.Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 09 Feb : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी वर्षाच्या निमित्ताने मुंबईत सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी अनेक सेलिब्रिटी आणि दिग्गजांनी हजेरी लावली होती.

ज्यामध्ये अभिनेता सलमान खान, गायक अदनान सामी, तसंच शिल्पा शेट्टीचा देखील समावेश होता. तर याच सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरून आता ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊत यांनी आरएसएस आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले, "संघाच्या कार्यक्रमात अनेक सिने कलाकार, शास्त्रज्ञ, विविध क्षेत्रांतले मान्यवर उपस्थित होते. त्यातल्या काही लोकांना पाहून आम्हाला भाजप आणि संघाच्या राष्ट्रभक्तीबद्दल धक्का बसला. किती ढोंग आणि पाखंड आहे? आम्ही पाहिलं गायक अदनान सामी हा सरसंघचालकांसोबत बसून ब्रेकफास्ट करतोय.

RSS Chief Mohan Bhagwat at the RSS Centenary event in Mumbai alongside prominent celebrities, sparking political reactions from leaders like Sanjay Raut.
Shivsena Politics : "आमच्याकडे 237 आमदार, उगाचच धाडस..." उद्धव ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर जाण्याच्या चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिलेदाराने डिवचलं

सरसंघचालकांना कदाचित माहिती नसावं किंवा कार्यक्रम आयोजित केलेल्यांना हे माहिती नसावं की सरसंघचालकांच्या बाजूला बसलेल्या अनेक व्यक्तींचा देशविरोधी कृत्यांमध्ये सहभागी आहे. अदनान सामीचे वडील अर्शद खान हे पाकिस्तानच्या हवाई दलात होते. 1965 च्या युद्धात अर्शद खान यांनी भारतावर बॉम्बिंग केलं होतं. पठणाकोटचा तळ उद्ध्वस्त केला होता.

तो अदनान सामी सरसंघचालकांच्या शेजरी बसला होता. तुम्ही भारताला कोणती प्रेरणा देत आहात? कोणत्या इतिहासाचे धडे देत आहात? असा सवाल उपस्थित करत राऊतांनी संघावर जोरदार टीके केली. शिवाय अदनान सामीटींप्रमाणेच गीतकार जावेद अख्तर यांना का बोलावलं नाही? त्यांचे काका अंदमानमध्ये सावरकरांबरोबर काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते.

RSS Chief Mohan Bhagwat at the RSS Centenary event in Mumbai alongside prominent celebrities, sparking political reactions from leaders like Sanjay Raut.
Dharashiv ZP Election : धाराशिवमध्ये ठाकरेंच्या शिलेदाराने फक्त एका मताने उधळला गुलाल

हे बहुतेक माहिती नसेल, असंही राऊत यावेळी म्हणाले. मात्र, जावेद अख्तर आणि शाहरुख खान हे सगळे संघाच्या दृष्टीने राष्ट्रद्रोही आहेत. पण अदनान सामी, लुकआऊट नोटीस असणाऱ्या नट-नट्या हे संघ परिवाराच्या दृष्टीने नवीन राष्ट्रभक्त आहेत, असं म्हणत राऊतांनी संघाच्या कार्यक्रमावर टीका केली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com