Sanjay Nirupam: आरटीओ अधिकारी ऑटो चालकांची 'मराठीची टेस्ट' घेणार! परप्रांतियांचं धाबं दणाणलं; GRवर निरुपम यांनी व्यक्त केली चिंता

Sanjay Nirupam: राज्य परिवहन विभागानं येत्या एक मे पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत बोलता येणं अनिवार्य केलं आहे. त्याचा निषेध म्हणून एक तारखेला परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हे संपावर जाणार आहेत.
Pratap Sarnaik Sanjay Nirupam Eknath Shinde .jpg
Pratap Sarnaik Sanjay Nirupam Eknath Shinde .jpgSarkarnama
Published on
Updated on

Sanjay Nirupam: राज्य परिवहन विभागानं येत्या एक मे पासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषेत बोलता येणं अनिवार्य केलं आहे. त्याचा निषेध म्हणून एक तारखेला परप्रांतीय रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक हे संपावर जाणार आहेत. मात्र, दुसरीकडं या निर्णयाचे मराठी ऑटो-रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर शिवसेना शिंदे गटातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्या या निर्णयाला त्यांच्याच पक्षातील नेते संजय निरुपम यांनी विरोध दर्शवला आहे. दरम्यान सर्वच रिक्षाचालकांची आरटीओकडून प्रत्यक्षात मराठीची टेस्ट घेण्यात येणार असल्यानं परप्रांतीय चालकांचं धाब दणाणलं आहे. पण यासंदर्भात जीआरमध्ये केलेल्या एका उल्लेखामुळं संजय निरुपम यांनी चिंता व्यक्त केली आहे.

Pratap Sarnaik Sanjay Nirupam Eknath Shinde .jpg
Rahata Loni harassment : रस्त्यात छेडछाड, जाब विचारताच मुलीवर झडप; व्हिडिओ व्हायरल होताच हिंदुत्ववादी आक्रमक

पक्षाच्या भूमिकेचं स्वागत पण...

राज्य शासनाच्या रिक्षा चालकांना केलेल्या मराठी सक्तीबाबत निरुपम यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात जे लोक राहतात त्यांनी मराठी बोललं पाहिजे, त्यांना मराठी समजलं पाहिजे, त्यांनी मराठी भाषेत संवाद केला पाहिजे अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे माझी पण तीच भूमिका आहे. पण मराठीचा आग्रह धरताना जर एखाद्याला मराठी येत आहे की नाही ते समजून घेतलं पाहिजे. टॅक्सी चालकांसाठी परिवहन विभागानं जो काही जीआर काढला आहे, त्यानुसार किमान काम चालऊ मराठी बोलताना आली पाहिजे, सगळ्यांसाठी हा एक चांगला विषय आहे.

Pratap Sarnaik Sanjay Nirupam Eknath Shinde .jpg
Operation Lotus : 'आप'नंतर भाजपच्या रडारवर महाराष्ट्रासह देशातील 4 मोठे पक्ष : घटनादुरूस्ती विधेयकाला विरोध करणाऱ्यांना हादरे?

निरुपमांना नेमकी कशाची वाटतेय भीती?

पण या निर्णयाची अंमलबजावणी करताना १ मे पासून आरटीओ अधिकारी सगळ्या ऑटो चालकांना मराठी भाषा बोलता येते का? याची टेस्ट घेणार आहेत, तसंच जर ते याच्यात नापास झाले तर त्यांचं परमिट रद्द होणार आहे. त्याचबरोबर त्यांचा बॅचही जप्त केला जाईल अशी जीआरमध्ये तरतूद आहे. जीआरमधला ही एक चिंतेची बाब आहे, त्याच्यामुळं आमचे टॅक्सीवाले आणि ऑटोवाले घाबरले आहेत. त्यामुळं मी परिवहन विभागाला पत्र लिहिलं आहे की, तुम्ही मराठीचा विषय काढत आहात तर तो एक चांगला विषय आहे. तो कायम ठेवलाच पाहिजे पण तुम्ही अशा प्रकारे परमिट आणि बॅच रद्द करण्यााच इशारा किंवा धमकी देऊ नका, नाहीतर लोकांसमोर उदरनिर्वाहाचं संकट निर्माण येईल त्यांची रोजीरोटी अडचणीत येईल.

Pratap Sarnaik Sanjay Nirupam Eknath Shinde .jpg
Pune rickshaw license rule : महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी निर्णय कोणत्याही दबावाखाली बदलू नये; शिवतारेंचे फडणवीस, शिंदे यांना पत्र

मराठी शिकवणी केंद्र होणार सुरु

याच्यासाठी माझं एक निवेदन आहे की, या सगळ्या परप्रांतिय लोकांना थोडा वेळ द्या मराठी शिकण्यासाठी. त्यानुसार मुंबईत मराठी शिकण्यासाठी एक नवीन केंद्र सुरू करण्यात येत आहे, तिकडे आम्ही सर्व परप्रांतीय रिक्षाचालकाना बोलवणार आहोत आणि त्यांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहोत. यासाठी चालकांना पुरेसा वेळ दिला पाहिजे जेणेकरून सगळे मराठी शिकू शकतील आणि मराठीतच प्रवाशांसोबत संवाद साधतील, अशी मागणीही संजय निरुपम यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com