Pimpri Chinchwad politics : अजितदादांच्या बालेकिल्ल्यात ठिणगी! पराभवानंतर नेत्यांमध्ये जुंपली; योगेश बहलांचा स्थानिक आमदारांवर थेट निशाणा!

Ajit Pawar NCP News : पिंपरी चिंचवडमधील पराभव स्थानिक नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.
Ajit Pawar Contractors
Ajit Pawar Contractors Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील महापालिका निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली. विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊनही पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकेकाळी बालेकिल्ला असलेल्या पुणे, पिंपरी चिंचवड महापालिकेत पराभव स्वीकारावा लागला. विशेषता पिंपरी चिंचवडमधील पराभव स्थानिक नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

पिंपरी चिंचवडमधील परभावानंतर नेत्यांमध्ये चांगलीच जुंपली आहे. या निवडणुकीतील पराभवाचे खापर नेतेमंडळी एकमेकांवर फोडण्यात व्यस्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्थानिक आमदार अण्णा बनसोडे व माजी आमदार विलास लांडे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.

Ajit Pawar Contractors
Congress Star Campaigner : काँग्रेसने एक माजी मुख्यमंत्री, 6 खासदार, 8 आमदारांसह 40 नेत्यांना उतरवले ZPच्या आखाड्यात

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला सलग दुसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागल्यानंतर आता पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वाद सुरू झाला आहे. पिंपरीचे आमदार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे पुत्रप्रेमात अडकल्याने त्यांनी दुसऱ्या प्रभागांमध्ये लक्ष दिले नाही. प्रचारप्रमुख असलेले माजी आमदार विलास लांडे हेही प्रचारात फिरकले नाहीत, असा आरोप योगेश बहल यांनी केला.

Ajit Pawar Contractors
BJP Vs Shivsena : भाजपने डाव अजूनही सोडलेला नाही : ऐनवेळी दगा देणाऱ्या शिंदेंविरोधात रवींद्र चव्हाण मोठ्या खेळीच्या तयारीत

या निवडणुकीत सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपच्या काळातील भ्रष्टाचाराचे मुद्दे मांडण्यात पक्ष कमी पडला, अशी कबुली त्यांनी दिली. एवढेच नव्हे तर या भ्रष्टाचाराचे मुद्दे जनतेसमोर मांडून त्याची पोलखोल करण्यात आम्ही यशस्वी झालो असतो तर या निवडणुकीत यश मिळाले असते असेही त्यांनी स्पष्ट केले.

Ajit Pawar Contractors
NCP SP Leader : पवारांच्या नेत्याचा मोठा दावा; ‘ज्यांनी ज्यांनी माझा पराभव केला, ते पुढे आमदार झाले’

विधानसभेचे उपाध्यक्ष व आमदार अण्णा बनसोडे हे केवळ त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ बनसोडे यांच्या प्रचारात व्यस्त राहिले तर माजी आमदार विलास लांडे यांच्या चिरंजीवाला उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते. त्या कारणामुळे त्यांनी महापलिका निवडणुकीच्या प्रचाराकडे पाठ फिरवली, असा आरोपही योगेश बहल यांनी केला आहे.

Ajit Pawar Contractors
BJP Vs Shivsena : भाजपने डाव अजूनही सोडलेला नाही : ऐनवेळी दगा देणाऱ्या शिंदेंविरोधात रवींद्र चव्हाण मोठ्या खेळीच्या तयारीत

भाजपने पिंपरी-चिंचवडमध्ये आपली सत्ता कायम राखल्याने अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीत चिंतेचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोघेजण एकत्र आल्याच्या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता, ज्याचा फायदा भाजपला मिळाल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar Contractors
Nagpur Congress : ठाकरेंना 9 वर्षांपूर्वी नडलेले सगळे घरी बसले; खुर्ची गमावावी लागलेला नेता पुन्हा विरोधी पक्षनेते

त्यामुळे या पराभवानंतर स्थानिक नेत्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात असल्याने अजित पवार या अंतर्गत वादावर काय तोडगा काढतात आणि नाराजांची मनधरणी कशी करतात ? यावर पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे पुनरुज्जीवन अवलंबून असणार असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Ajit Pawar Contractors
BJP Mayor : काँग्रेसच्या हातातून महापालिका गेली, भाजपने सत्तागणित जुळवले; प्रकाश आंबेडकरांनाही धक्का!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com