Sanjay Raut on Amit Shah : अमित शाह यांची शेवटची फडफड; चार जूननंतर त्यांचे कांड बाहेर येईल...संजय राऊत

Narendra Modi : काँग्रेस व शिवसेनेवर केलेल्या टीकेवरून खासदार संजय राऊत यांनी मोदी व शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.
Amit Shah, Sanjay Raut, Narendra Modi
Amit Shah, Sanjay Raut, Narendra Modisarkarnama

Mumbai Political News : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका केली आहे. अयोध्येत आंदोलन सुरू होतं तेव्हा हे डरपोक लोक कुठे होते. तेव्हा मैदानात शिवसेना होती हे जग जाहीर आहे. अमित शाह यांची ही शेवटची फडफड सुरू आहे. चार जूननंतर यांनी केलेले सर्व कांड बाहेर येतील, असा सूचक इशारा शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील ४८ जागा जिंकण्यासाठी जोरदार तयारी केली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या महाराष्ट्रात सभा होत आहे. या सभेतून त्यांनी काँग्रेस व शिवसेनेवर केलेल्या टीकेवरून खासदार संजय राऊत यांनी मोदी व शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.

नरेंद्र मोदींवर टीका करताना संजय राऊत म्हणाले, मोदी हे निवडणुका हरणार आहेत. चार जूननंतर नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष सत्तेत नसेल, अशी भविष्यवाणी करत देशात 70 वर्षांपर्यंत त्यातील 50 वर्षे काँग्रेसने प्रधानमंत्री दिला आहे, सर्वात चांगले प्रधानमंत्री झालेत. या सर्व प्रधानमंत्र्यांनी जो देश बनवला आहे, तो देश विकण्याचे एकच काम प्रधानमंत्री मोदी करत आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केली आहे.

Amit Shah, Sanjay Raut, Narendra Modi
Narendra Modi Sabha In Madha: मोहिते पाटलांना जोर का झटका देत माढा पुन्हा जिंकण्यासाठी मोदी उतरणार मैदानात!

अमित शाह यांच्यावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, जेव्हा अयोध्येत आंदोलन सुरू होतं तेव्हा हे डरपोक लोक कुठे होते. तेव्हा मैदानात आम्ही आणि शिवसेना होती हे जग जाहीर आहे. अमित शाह यांची शेवटची फडफड सुरू आहे चार जूननंतर यांनी केलेले सर्व कांड बाहेर येतील. हे लोक निवडणुका हरणार आहेत. त्यामुळे रामाच्या नावाने आणि अयोध्याच्या मुद्द्यावरून निवडणुका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उद्या दाऊद, शकील यांना क्लीन चिट दिली जाईल..

सुनेत्रा पवार यांना दिलेल्या क्लीन चिटवर संजय राऊत म्हणाले, भाजप हे आता वॉशिंग मशिनसह क्लीन चिटची फॅक्टरीदेखील आहे. दाऊद इब्राहिम, छोटा शकील, विजय मल्ल्या, नीरव मोदी या सर्व लोकांनादेखील भाजप क्लीन चिट देऊ शकते.

यांना जर निवडणुका जिंकायच्या असतील, तर यांचा आधार त्यांना घ्यावा लागणार आहे. दहशत माजवण्यासाठी आणि देश लुटण्यासाठी हे सर्व चालले आहे. उद्या जर दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील यांना क्लीन चिट देण्याची बातमी आली तर आम्हाला आश्चर्य वाटणार नाही, असेही ते म्हणाले.

Amit Shah, Sanjay Raut, Narendra Modi
Amit Shah News : शरद पवारांच्या माफीवर अमित शाहांचा पलटवार, अजित पवारांचा उल्लेखही टाळला?

अमित शाह तेव्हा राजकारणात होते का?

देशात काँग्रेसचं राज्य असताना शिवसेना आयोध्या आंदोलनात उतरली होती. बाबरी मशीद पाडल्याची जबाबदारी घ्यायला हे तयार नव्हते. स्वतः अमित शाह यांच्या पक्षाचे नेते सुंदरसिंग भंडारी यांनी स्वतः भाजपचा या घटनेची काहीही संबंध नसून शिवसेनेने हे कृत्य केलं असल्याचं जाहीर केलं होतं. अमित शाह तेव्हा राजकारणात किंवा तिथे मैदानात तरी होते का?असा सवाल त्यांनी केला. गोधरा कांड करण्याइतक अयोध्याकांड सोपं नव्हतं.

Amit Shah, Sanjay Raut, Narendra Modi
Latur Congress News : काकांचा सल्ला ऐकला अन् अमित देशमुखांचे काँग्रेसमध्ये वजन वाढले...

पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबाबत संजय राऊत म्हणाले, ज्यांच्याकडे बहुमत आहे, तो त्या पदापर्यंत जाईल. दहा वर्षांपर्यंत तुमच्याकडे बहुमत होतं तुम्ही प्रधानमंत्री बनलात. आमच्याकडे एकाहून जास्त चेहरे प्रदान मंत्रिपदासाठी आहेत.

Edited By : Umesh Bambare

R

Amit Shah, Sanjay Raut, Narendra Modi
Sanjay Raut: 'लोकसभेनंतर ठाकरे गटात फक्त पिता-पुत्रच...,' राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शिंदे गटाचं प्रत्तुत्तर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com