Loksabha Election 2024 : संजय राऊत यांच्यावर ज्योती वाघमारेंची टीका; म्हणाल्या, तर त्यांना जोड्याने हाणले असते...

Dr.Jyoti Waghmare महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्ये संजय राऊत यांनी केलेली आहेत. एखाद्या महिलेला नाची म्हणणे, तुम्हाला डोळे मारेल, बोलवेल अशी विधाने हा पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असे डॉ. ज्योती वाघमारे यांनी म्हटले
Sanjay Raut, Jyoti Waghmare
Sanjay Raut, Jyoti Waghmaresarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. या वरुन शिंदे गट शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राऊत यांच्यावर सडेतोड टीका केली आहे. महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्ये राऊतांनी केली असून अशी विधाने पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर या राऊताला जोड्याने हाणले असते, असे खडसावले आहे.

डॉ. ज्योती वाघमारे यांनी म्हटले की, नवनीत राणा यांच्या संदर्भात संजय राऊत यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली.जर बाळासाहेब ठाकरे असते तर या राऊताला जोड्याने हाणले असते. महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्ये संजय राऊत यांनी केलेली आहेत. एखाद्या महिलेला नाची म्हणणे, तुम्हाला डोळे मारेल, बोलवेल अशी विधाने हा पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही.

हा शिवछत्रपतींचा, जिजाऊ, सावत्री, रमाईचा महाराष्ट्र आहे ना मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे गप्प का आहेत? कित्येकवेळेला महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का कुठे आहात तुम्ही? या महाराष्ट्रातील दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे मूग गिळून का बरं गप्प आहात? का फक्त स्वत:ची बुलंद कहाणी लिहण्यात व्यस्त आहेत.

Sanjay Raut, Jyoti Waghmare
Shivsena News : कल्याणमध्ये ठाकरे गटाला धक्का; जिल्हा महिला संघटकासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश!

लक्षात ठेवा रावण सुद्धा महाविद्वान होता. पण, सीतामाईचा अपमान केला आणि रावणाची सोन्याची लंका जळाली. सामर्थ्यवान असणारं हस्तिनापूरसुद्धा द्रौप्रदीच्या अपमानाने उद्धस्त झालं होते आणि महाविकास आघाडीची लंका ही संजय राऊताच्या अशा बेताल बडबडीमुळेच जळून जाणार आहे. कारण महाराष्ट्राला महिलांचा अपमान सहन होणार नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

इथून पुढे जर संजय राऊत एखाद्या महिलेला नाची म्हणणार असतील तर संजय राऊत तुम्हाला महाविकास आघाडीचा नाचा म्हणायचे का? महाराष्ट्रातील महिला संजय राऊत याची जोड्याने पुजा बांधतील, अशी टीका शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी केली.

Edited By : Umesh Bambare

Sanjay Raut, Jyoti Waghmare
Sanjay Raut : राऊतांना नवनीत राणांवरील टीका भोवणार? युवा स्वाभिमान पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी उचललं मोठं पाऊल

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com