Assembly Special Session : "इकडून जयंतराव, तिकडून तू, मग...", शिरसाटांची वैभव नाईकांना ऑफर; जोरदार जुगलबंदी

Sanjay shirsat Vs Vaibhav Naik : विधिमंडळाबाहेरील शिरसाट आणि नाईकांमधील जुगलबंदीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Sanjay shirsat Vaibhav Naik
Sanjay shirsat Vaibhav Naiksarkarnama
Published on
Updated on

दीड वर्षापूर्वी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेत बंडखोरी केली. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही शिंदे गटाला मिळालं. यानंतर ठाकरे गटाला गळती लागली असून, अनेक नगरसेवक, आमदार, खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला. पण, काही कट्टर शिवसैनिक अद्यापही ठाकरेंच्या शिवसेनेत राहिले आहेत. अशातच शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांच्यात जुगलबंदी पाहायला मिळाली आहे.

Sanjay shirsat Vaibhav Naik
Maratha Reservation Vishesh Adhiveshan : मराठा आरक्षणाचा गुलाल उधळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...

मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation ) देण्यासाठी मंगळवारी ( 20 फेब्रुवारी ) विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. या अधिवेशनाला सर्वपक्षीय आमदार मुंबईत उपस्थित होते. या वेळी संजय शिरसाट आणि वैभव नाईक यांची भेट झाली. तेव्हा संजय शिरसाटांनी वैभव नाईकांना थेट शिंदे गटात येण्याची ऑफर दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

संजय शिरसाट म्हणाले, "जयंत पाटील एक येणारेत इकडनं... आणि तिकडनं तू येणारेस." त्यावर "माझं राहू द्या, तुमच्या शपथविधीचं काय झालं?" असं म्हणत नाईकांनी शिरसाटांना टोले लगावले.

Sanjay shirsat Vaibhav Naik
Maratha Reservation Session : पुन्हा तेच... मुख्यमंत्री बोलायला उठले; पण फडणवीसांनी पुन्हा खाली बसवलं...

दोघांत नेमका काय संवाद झाला?

वैभव नाईक - तुम्ही शपथ कधी घेताय?

संजय शिरसाट - तू आला तर आमच्याकडे मंत्रिमंडळ विस्तार होईल..

वैभव नाईक - अजित पवार आले.. अशोक चव्हाण आले...

संजय शिरसाट - जयंत पाटील येणारेत तिकडनं.. इकडून तू येणार आहे.. मग बरोबर शपथ घेता येईल.

वैभव नाईक - मी येणार आहे ते राहूदे... पण तुमच्या शपथविधीचं काय झालं?

संजय शिरसाट - आपण बरोबर शपथ घेऊ ना...

वैभव नाईक - तुम्ही त्या आणि या शिवसेनेचे संस्थापक सदस्य आहात..

संजय शिरसाट - नाहीतर तू मुख्यमंत्र्यांना सांग...

वैभव नाईक - आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू, ज्यांनी उठाव केला, त्यांना मंत्रिपद दिलं पाहिजे.. आम्ही कधी येणार नाही... आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंबरोबर राहणार आहोत.

संजय शिरसाट - रवींद्र वायकरसुद्धा असेच म्हणत होते...

वैभव नाईक - नाही, नाही... वायकर असुदेत.. पण आम्ही उद्धव ठाकरेंबरोबर आहोत...

R

Sanjay shirsat Vaibhav Naik
Jitendra Awhad on Ajit Pawar : जनाची नाही मनाची असेल तरी एखादा राजीनामा देईल; आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com