Maratha Reservation Session : पुन्हा तेच... मुख्यमंत्री बोलायला उठले; पण फडणवीसांनी पुन्हा खाली बसवलं...

Assembly Session : यापूर्वीही मुख्यमंत्री शिंदे बोलत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा माईक खेचून स्वत: बोलण्याचा प्रयत्न केला होता.
Assembly Session
Assembly SessionSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : मराठा आरक्षणप्रकरणी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाल्यापासून बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्धार केला. त्यानुसार आज मराठा आरक्षण देण्यासंदर्भात विशेष अधिवेशन बोलावण्यात आले. मात्र, अधिवेशनाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलण्यासाठी उभे राहिले असता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे यांना खाली बसवून स्वत: उत्तर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. (Maratha Reservation News)

मराठा आरक्षणप्रश्नी आज राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदे हे मराठा आरक्षण विधेयक सभागृहात मांडण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी विरोधकांनी सर्व प्रथम राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत सभागृहाच्या पटलावर घेण्याची आणि त्यावर आभार व्यक्त करण्याची मागणी लावून धरली. त्यावेळी मराठा आरक्षणाच्या विधेयकावर बोलायला उभा राहिलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांना खाली बसवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या मागणीवर स्वत: उत्तर दिले. फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांना विरोधकांच्या मागणीचा विचार करून राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर घेण्याची विनंती केली. (Eknath Shinde)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Assembly Session
Manoj Jarange Patil News : भल्याभल्यांना घाम फोडणाऱ्या राज ठाकरेंनीही घेतला जरांगेंचा धसका; म्हणाले, ‘ए बाबा...’

मुख्यमंत्र्यांना खाली बसवलं

दरम्यान, उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खाली बसवून स्वत: उत्तर दिल्यामुळे ही घटना पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे. कारण यापूर्वीही शिंदे बोलत असताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा माईक खेचून स्वत: बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर दुसऱ्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना चिठ्ठी दिली होती. विश्वासदर्शक ठरावावर बोलताना फडणवीस यांनी आता बास करा अधिक बोलू नका, असा इशारा केला होता. एवढेच नाही, तर मुख्यमंत्री शिंदे यांनी आभाराचे भाषण करण्यापूर्वी फडणवीसांची परवानगी घेतली होती. (Devendra Fadnavis)

आज सभागृहात मुख्यमंत्र्यांना खाली बसवून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्तर दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे फडणवीस अद्यापही सुपर सीएमच्या भूमिकेत आहेत का काय? अशी चर्चा रंगू लागली आहे. या संपूर्ण प्रकारानंतर सभागृहात सुरुवातीला राज्यपालांच्या अभिभाषणाची प्रत पटलावर घेण्यात आली. तसेच, त्यांच्या अभिभाषणावर पावसाळी अधिवेशनात चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Assembly Session
Raj's Reaction on Maratha reservation मराठा आरक्षणाच्या मंजुरीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया; ‘हा आनंद मानण्यासारखा निर्णय नाही’

मराठा आरक्षणाचे विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मराठा आरक्षणप्रश्नी विरोधकांनी मला एक पत्र पाठवलं आहे. त्यामध्ये त्यांनी हे आरक्षण टिकणारे शाश्वत देणार आहात का? तसेच सगेसोयरे अधिसूचनेचे काय अशी विचारणा केली आहे. परंतु मी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्याचे वचन दसरा मेळाव्यात दिले होते. त्यानुसार आम्ही मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सांगू इच्छितो की आम्ही 3 महिन्यांत आरक्षण दिले आहे. मी ज्यावेळी मराठा समाजाला वचन दिले होते की, फेब्रुवारी महिन्यात अधिवेशन घेऊन आरक्षण देणार, परंतु त्यावेळी माझ्यावर आरोप लागले की, त्यावेळी आचारसंहिता जाहीर होणार, एकनाथ शिंदे मराठा समाजाला फसवणार. मात्र, मी दिलेला शब्द आज पूर्ण करत आहे.

Assembly Session
Chhagan Bhujbal : "माझा मराठा आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा, पण...", भुजबळ विधानसभेत संतापले

मी संपूर्ण राज्याचा मुख्यमंत्री आहे. मला एका जातीचा किंवा धर्माचा विचार करता येणार नाही. राज्यात आपले इतरही समाज बांधव आहेत. जर त्यांच्यावर असा प्रसंग आला असता तर माझी भूमिका त्या समाजासाठीही मराठा समाजाच्या बाबतीत जी घेतली आहे, तीच राहिली असती. त्यामुळे हे सरकार कोणताही दुजाभाव न करता काम करत आहे. मराठा समाजाला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही शैक्षणिक आणि नोकरीत आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच, मराठा आरक्षणासाठी विरोधी पक्ष आणि आम्ही एका विचाराचे असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

R

Assembly Session
Maharashtra Assembly Session LIVE Updates : आम्ही शब्द पाळतोय! जरांगेंच्या उपोषणावर एकनाथ शिंदे विधिमंडळात बोलले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com