
Mumbai, 07 January : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खूनप्रकरणी एसआयटी नेमण्याची पहिली मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मी माझ्या पात्रतेप्रमाणे असणाऱ्या विषयावर बोलते. माझ्यापेक्षा जादा अभ्यास असणाऱ्या लोकांच्या विषयांवर मी उत्तर देऊ शकत नाही, अशा शब्दांत राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस यांना टोला लगावला.
पर्यावरणाच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना पंकजा मुंडे यांनी भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांच्याकडून संतोष देशमुख खूनप्रकरणावरून धनंजय मुंंडे आणि बीडमधील वाढती गुन्हेगारीला पंकजा मुंडे जबाबदार आहेत असा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी धस यांना टोला लगावला.
पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख खूनप्रकरणी कोणी कितीही मोठा असला तरी आम्ही त्याला सोडणार नाही, असे सांगितले आहे. तेव्हा त्या विषयाला मी नेहमी चालू ठेवते, तेव्हा माझा उद्देश सरळ स्पष्ट आहे, असे मला वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगूनही आपण विषय वाढवत असू तर ते अप्रत्यक्षपणे सरकारवरच प्रश्नचिन्ह लागते. दररोज या विषयावर बोलावं, अशी माझी मानसिकता नाही. या प्रकरणाला धरून इश्यू करायचा, हा माझा स्वभाव नाही. एखाद्या प्रकरणातून काहीतर काढायचं, हा माझा हेतू नाही.
खुनसारख्या संवदेशील विषयावर दररोज मीडियासमोर येऊन बोलणं योग्य नाही. मी एकदा एक भूमिका मांडली की दररोज त्याच भूमिकेला उगळत बसणे म्हणजे देशमुख कुटुंबीयांच्या दुःखाला उगळण्यासारखं आहे. देशमुख खून प्रकरणाचा एक मंच तयार करून आम्ही आमचं व्यक्त होणाचं साधन करतोय, असं मला वाटतंय. एखादा खूनच निर्घृण नसतो, तर आपला व्यवहारही निर्घृण असतो, असा आरोप पंकजाताईंनी केला.
त्या म्हणाल्या, एखाद्या दुःखद घटनेतून आपण काहीतरी मिळवत, असू तर ते चुकीचं आहे. तो माझा स्वभाव नाही. मात्र, संतोष देशमुख खून प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला शिक्षा झालीच पाहिजे. संतोष देशमुख हा माझा कार्यकर्ता होता. त्यांच्या लेकराकडे पाहून माझ्या मनात काय वेदना होतात, हे तुम्हाला सांगण्याची आणि त्याचं प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही.
पंकजा मुंडे म्हणाल्या, संतोष देशमुख खून प्रकरणातून काही तरी वेगळं मिळविण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. मी न बोलणयाचं काय कारणं आहे. मी पाच वर्षे या राज्याच्या राजकारणातून बाहेर होते. त्यामुळे कोण अधिकारी कोणाचे आहेत? कोण अधिकारी कोठून आलेत? ते मी आणले आहेत का? तेव्हाचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री आणि यंत्रणनेने ते आणले आहेत. आता तेही म्हणत आहेत की दोषीला शिक्षा झालीच पाहिजे. त्याचा रोज उल्लेख करणे, माझ्या राजकीय उंचीला योग्य वाटत नाही.
संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या भेटीपासून मलाच वंचित राहावं लागलं आहे. त्यांच्या मुलांना घेऊन भाषण करणं यापेक्षा त्यांना न्याय मिळणं, महत्वाचं आहे, अशी भावनाही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.