आता शाहरूख खान यानेच पुढे येऊन सांगावे... खंडणी दिली की नाही? दिली तर किती दिली?

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणात रोज नव्या खुलाशांचा सिलसिला सुरूच
Shahrukh & Gauri Khan, Aryan Khan
Shahrukh & Gauri Khan, Aryan KhanSarkarnama
Published on: 
Updated on: 

मुंबई : अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी (NCB) आणि त्यातही त्यातील `चांडाळ चौकटी` वर जोरदार प्रहार केला. तसेच कार्डिलिया क्रुझ प्रकरणी आर्यनखान याचे अपहरण करण्यात आले असून त्याच्याकडून खंडणी उकळण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला. तसेच शाहरूखकडून खंडणी घेण्यात आली. एनसीबीच्या चांडाळ चौकटीने ज्यांच्याकडून अशी खंडणी उकळली आहे, त्यांनी आता पुढे यावे, असे आवाहन मलिक यांनी केले आहे.

मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत पुन्हा नव्या आरोपांची मालिका सुरू केली. तसेच आपली ही लढाई एनसीबीच्या विरोधात नाही. भाजपच्याही विरोधात नाही. फक्त जे सडलेले आंबे आहेत, अशा मंडळींच्या विरोधात आहे. त्यामुळे भाजपने चुकीच्या लोकांच्या संरक्षणासाठी पुढे येऊ नये, असा सल्ला मलिक यांनी दिला.

मोहित कंबोज, प्रतीक गाभा आणि आमिर फर्निचरवाला हे आर्यन खानला घेऊन क्रुझवर घेऊन गेले. मोहित कंबोजच्या मार्फत अपहरणाचा हा कट होता. 18 कोटीमध्ये डिल झाली होती. पण एका सेल्फीमुळे सगळं अडकल्याचे मलिक यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे दुसरे मंत्री अस्लम शेख यांनाही यात अडकविण्याच कट होता, असा खळबळजनक गौप्यस्फोट करत हा सारा खेळ चांडाळ चौकटीने रचल्याचा आरोप त्यांनी केला. अस्लम शेख यांना क्रुझवर घेऊन जाण्यासाठी किती आग्रह होता, हे तुम्ही त्यांना विचारा. महाराष्ट्रातील मंत्री आणि त्यांच्या मुलांना अडकविण्याचे काम कंबोजमार्फत सुरू होते. `उडता पंजाब` नंतर `उडता महाराष्ट्र`, अशी प्रतिमा करण्याचा कट होता, असे त्यांनी सांगितले.

Shahrukh & Gauri Khan, Aryan Khan
आर्यन खान प्रकरणात रहस्यमय 'सुनिल पाटील'ची एन्ट्री, मास्टरमाईंडही तोच?

कार्डिलिया क्रुझ प्रकरणात ज्या लोकांनी एनसीबीला खंडणी दिली त्यांनीच आता पुढे यावे. अशा प्रकरणात ते काही आरोपी ठरीत नाहीत तर ते व्हिक्टिम म्हणजे पिडित ठरतात. त्यांच्यावर कारवाई होत नाही. मात्र ज्यांनी खंडणी गोळा केली ते या पिडितांना त्रास देत त्यांना पुढे अडकविण्याची धकमी देत आहेत. आर्यन खान प्रकरणी डिल झाली होती, हे आता उघड झाले आहे. शाहरूखखानची मॅनेजर पूजा ददलानी हिचे नाव यात पुढे आले असून पैशाचा व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे आता एनसीबीच्या कारवायांना न घाबरता शाहरूख यानेच खुलासा करावा, असे मलिक यांनी म्हटले आहे.

Shahrukh & Gauri Khan, Aryan Khan
आर्यन खानला अडकवण्याचे भाजप नेत्याचेच षडयंत्र! मलिकांनी डाव पलटवला

मी भाजपसोबत लढाई लढत नाही. या शहरात ड्रग्सच्या नावाने हजारो कोटींची लूट केली जात आहे. फ्राॅड लोकांना भाजपने पाठीशी घालू नये. सुनील पाटिल, मोहित कंबोज हे वानखेडेच्या खासगी सैन्यातील मंडळी असल्याचे त्यांनी वारंवार सांगितले. असे लोक राजकीय पक्षांना वापरून घेत असल्याचा दावा त्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.