Sharad Pawar News : साईबाबांच्या दर्शनाला आले, शरद पवारांच्या दर्शनाची काय गरज?; PM मोदींना पवारांनी फटकारले

Sharad Pawar On PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डीत केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.
sharad Pawar, PM Modi
sharad Pawar, PM ModiSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Politics News : पंतप्रधान मोदी शिर्डीला येऊन गेले. साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी कृषी खात्यातील माझ्या कामाबद्दल काही मुद्दे मांडले. पंतप्रधानपद हे संविधानिकपद आहे. या संविधानिकपदाची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे, पण त्यांनी दिलेली माहिती ही वास्तवापासून दूर आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींना सणसणीत प्रत्युत्तर दिलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

sharad Pawar, PM Modi
Sanjay Raut News : PM मोदींचं शरद पवारांवरील वक्तव्य म्हणजे विकृती; संजय राऊतांची बोचरी टीका

मग मी फाइलवर सही करण्याचा निर्णय घेतला

२००४ ते २०१४ ते या कालावधीत मी केंद्रीय कृषिमंत्री होतो. २००४ ला देशात अन्नधान्याची टंचाई होती. शपथ घेतल्यानंतर पहिल्याच दिवशी मला नाईलाजाने एक कटू निर्णय घ्यावा लागला. अमेरिकेतून गव्हाची आयात करण्याचा हा निर्णय होता. कारण देशातील साठा चांगल्या स्थितीत नव्हता. ती फाइल माझ्याकडे आली आणि मी दोन दिवस त्यावर विचार करत होतो. कारण मी अस्वस्थ होतो. आपण कृषिप्रधान देश म्हणतो आणि विदेशातून धान्य आयात करण्याची वेळ आली, मग पंतप्रधान मनमोहनसिंग यांचा फोन आला आणि देशातील धान्यसाठ्याची स्थिती काय आहे, माहिती आहे का? आज तुम्ही फाइलवर सही केली नाही तर रेशन दुकानांवर पुढील तीन-चार आठवड्यांत धान्य पोहोचणार नाही, असं मनमोहनसिंग म्हणाले. त्यामुळे मला त्या फाइलवर सही करावी लागली, असा एक प्रसंग शरद पवार यांनी पत्रकार परिषेदत सांगितला.

शरद पवार यांनी या वेळी देशातील २००४ ते २०१४ मध्ये कृषिमंत्री म्हणून घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. गहू, कापूस, सोयाबीन, तांदूळ, ऊस, मका आणि तुरीच्या दर सांगत त्यात आपण वाढ केल्याची शरद पवार यांनी दिली. मी कृषिमंत्री असताना देश अन्नधान्याबाबतीत स्वयंपूर्ण झाला. एकेकाळी आयातदार असणारा देश तांदळाच्याबाबतीत निर्यातदार झाला. शेती आणि सलग्न क्षेत्रातील उत्पादनात भारताची निर्यात २००३-०४ ते २०१३-१४ या १० वर्षांत ७.५ अब्ज डॉलरवरून निर्यात ४२.८४ अब्ज डॉलरवर गेली, असं शरद पवार म्हणाले.

sharad Pawar, PM Modi
Rohit Pawar Yuva Yatra : 'युवा संघर्ष यात्रा' स्थगित करून रोहित पवाराचं टायमिंग चुकलं, की टायमिंग साधलं?

शेतकऱ्यांच्या आत्महत्यामांगे सावकारी, खासगी आणि कर्जबाजारीपणा ही मुख्य कारणं होती. या आत्महत्या रोखण्यासाठी मी ६२ हजार कोटींची कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. ३५ हजारांचं अनुदान दिलं. शेततळ्याची योजना शेतकऱ्यांसाठी आणली. माझ्या कार्यकाळातील कामाची दखल आंतरराष्ट्रीय संघटनांनी घेतली, असं शरद पवार म्हणाले.

मी जिथे-जिथे जातो तिथे जनतेचा प्रतिसाद मिळतो. याचा रिपोर्ट त्यांच्याकडे गेला असेल कदाचित. पंतप्रधान साईबाबांच्या दर्शनाला गेले, तिथे शरद पवारांच्या दर्शनाची काय गरज होती?, असं म्हणत पवारांनी पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. साखर निर्यात करण्याची गरज आहे. साखरेला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी आहे, पण केंद्र सरकारने साखर निर्यातीवर बंदीचा निर्णय घेतला आहे, असं म्हणत पवारांनी सरकारला लक्ष्य केलं.

sharad Pawar, PM Modi
Sanjay Raut On Fadnavis : फडणवीस 'पुन्हा येणार' असतील तर स्वागतच.. ; संजय राऊतांचे 'सूचक' वक्तव्य!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.