Rohit Pawar Yuva Yatra : 'युवा संघर्ष यात्रा' स्थगित करून रोहित पवाराचं टायमिंग चुकलं, की टायमिंग साधलं?

Rohit Pawar Yuva Yatra : समाजाचे हित ध्यानात घेत यात्रा पुणे जिल्ह्यात, शिरूर तालुक्यात आर्वी येथे तूर्त थांबवली.
Rohit Pawar Yuva Yatra
Rohit Pawar Yuva YatraSarkarnama
Published on: 
Updated on: 

Rohit Pawar Yuva Yatra : राज्यातील युवावर्गाला भेडसावणारे नेमके प्रश्न घेऊन राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर अचूक वेळी पुणे ते नागपूर अशी यात्रा काढणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) युवा आमदार रोहित पवार यांची युवा संघर्ष ही पायी यात्रा शुक्रवारी (ता.२७) चौथ्या दिवशीच स्थगित करण्याची वेळ आली. त्यातून या यात्रेचे टायमिंग चुकल्याची, पण त्याचवेळी ती परिस्थिती पाहून थांबविण्याचे योग्य टायमिंगही साधल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या यात्रेचा समारोप हिवाळी अधिवेशनावेळी विधिमंडळ परिससरात मोर्चा काढून होणार होता. दरम्यान, चाळीस दिवसांच्या या यात्रेच्या रेट्याने राज्य सरकार आपल्या अडीच लाख रिक्त पदांची भरती सुरू करण्याची शक्यता होती. तसेच, त्यासाठीचे भरमसाठ शुल्कही ते कमी करण्याचा संभव होता. त्यामुळे युवा परीक्षार्थींना मोठा दिलासा मिळाला असता. दुसरीकडे पक्षफुटीनंतर शरद पवार राष्ट्रवादीने यंग ब्रिगेडवर अधिक भर दिला आहे. ते त्यांचे प्रश्न प्राधान्याने हाताळत आहेत. त्यासाठी युवांना ते पदाधिकारी म्हणून संधीही देत आहेत. त्याचा फायदा त्यांना पक्षबांधणी, तसेच आगामी निवडणुकीतही होणार होता. तो आता काही दिवस पुढे गेला आहे.

Rohit Pawar Yuva Yatra
Kangana Ranaut VS Subramanian Swamy : कंगना अन् भाजप खासदार सुब्रह्मण्यम स्वामींमध्ये ट्विटर वॉर; दोघांमध्ये जोरदार जुंपली...

गेल्या महिन्यापासून तयारी सुरू झालेली ही यात्रा या महिन्याच्या उत्तरार्धात सुरू झाली. दरम्यान, राज्यातील परिस्थितीने मोठी कूस बदलली. मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला दिलेली डेडलाइन (ता.२४) संपली. त्यामुळे दुसऱ्या दिवसापासून मराठा समाजाने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले. ते अधिक तीव्र करण्यात आले. पुढाऱ्यांना गावबंदी केली गेली. ग्रामपंचायत सदस्य, सरपंच ते राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचे राजीनामासत्र सुरू झाले. त्याचा मोठा फटका या यात्रेलाही बसणार होता. त्याची चुणूक सुरुवातीलाच शिरूर तालुक्यात दिसली. एका गावात तिला विरोध झाला.

पुढे तो गावबंदीमुळे आणखी तीव्र होण्याची भीती होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नि्र्माण होण्याचा मोठा धोका होता. तसेच, या यात्रेतही मराठा समाजाचेही युवा बहुसंख्येने असल्याने त्यांच्या भावनांचाही आदर राखणे गरजेचे होते. या सर्व शक्यता विचारात घेऊन आमदार रोहित पवार यांनी आपला व आपल्या पक्षाचा नाही, तर समाजाचे हित ध्यानात घेत यात्रा पुणे जिल्ह्यात, शिरूर तालुक्यात आर्वी येथे तूर्त थांबवली. पण मोठी झेप घेण्यासाठी हा अल्प विसावा आहे, ही त्यांची यावरील प्रतिक्रिया त्यांचा दांडगा विश्वास आणि निश्चय दाखविणारी आहे.

Rohit Pawar Yuva Yatra
PCMC News : अजितदादांचा गड चोहोबाजूंनी घेरला; रोहित पवार, जयंत पाटलानंतर आता सुप्रियाताई मैदानात

पुन्हा यात्रा सुरू होणार, पुन्हा सामील होणार -

पिंपरी-चिंचवडचे नवनियुक्त अध्यक्ष आणि माजी नगरसेवक तुषार कामठे, सुलक्षणा शिलवंत-धर तसेच देवेंद्र तायडे आदी या यात्रेत सहभागी झाले होते. त्यांच्याकडे नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यापर्यंत नियोजन आणि समन्वयाची जबाबदारी होती. यात्रा थांबल्याने ते काहीसे निराश दिसले, पण पुन्हा यात्रा होणारच आणि अजेंडाही तोच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मराठा आरक्षण आंदोलन संपताच पुन्हा ही यात्रा जेथून स्थगित झाली तेथून पुढे सुरू होईल आणि पुन्हा त्यात त्याच जोमाने सामील होऊ, असे या तिघांनीही सांगितले.

राऊत आणि रोहित पवारांचे कुटुंब सहभागी होणार होते -

या यात्रेत आघाडीतील तिन्ही पक्ष व त्यांचे नेतेही सामील होणार होते. नागपूरला सांगतेच्या वेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यात भाग घेणार होते. त्यापूर्वी उद्या (ता.२९) शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांची श्रीगोंदा येथे त्यात सभा होणार होती. त्यासाठी ते एक दिवस अगोदर म्हणजे आज (ता.२८) यात्रेत सामीलच होणार नव्हते, तर चालणारदेखील होते. तसेच दर शनिवारी आणि रविवारी रोहित यांची पत्नी आणि मुलेही त्यात सामील होणार होती. त्यांचे सहभागी होणे तूर्त काही दिवस ही यात्राच थांबल्याने लांबणीवर गेले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.