Shivsena MLA Disqualification News : राज्यासह देशाचे लक्ष लागलेला शिंदे-ठाकरेंच्या सत्तासंघर्षाचा निकाल अखेर लागला आहे. पक्ष फुटीनंतर ठाकरेंनी दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेवर निकाल देताना खरी शिवसेना मुख्यमंत्री शिंदेंची असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले. हा निकाल न्यायाला धरून नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रसेचे शरद पवारांनी नार्वेकरांना टोले लगावला आहे.
निकालाच्या पूर्वसंध्येला नार्वेकरांनी आपण कुणाच्याही दबावाला बळी पडून निर्णय घेणार नसल्याचे सांगितले होते. मात्र आजचा त्यांचा निकाल पाहिला तर तसे काही दिसत नसल्याचे पवारांनी म्हटले आहे. सत्ताधाऱ्यांकडून निकालाबाबत आधीच भाष्य केली जात होती. त्याचीच पुनरावृत्ती अध्यक्षांनी केली. निकालात विधीमंडळ पक्षाला महत्व देण्यात आले. सुभाष देसाईंच्या निकालाबाबत सुप्रीम कोर्टाने पक्षसंघटना महत्वाची असल्याचे सांगितले होते. अध्यक्षानी मात्र विधीमंडळामध्ये बहुमत आणि व्हीप कुणाचा आहे, याकडे लक्ष दिले, असेही पवार म्हणाले.
नार्वेकर काय म्हणाले होते ?
मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने ठाकरेंनी नार्वेकरांच्या निष्पक्षपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यावर नार्वेकर म्हणाले होते, 'केवळ निर्णय घेणाऱ्या व्यक्तीवर दबाब किंवा प्रभाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप केले जातात. मात्र मी आश्वासित करतो, की जो निर्णय घेणार आहे तो संविधानातील तरतुदीनुसार असेल. 1986 चे नियम आहेत, त्याआधावर निर्णय घेईल. तसेच विधिमंडळाचे पायंडे आहेत, याचा विचार करूनच निर्णय घेईल. त्यामुळे राज्यातील जनतेला न्याय देण्यात येईल', असेही त्यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
काय म्हणाले शरद पवार ?
'विधानसभा अध्यक्षांची गरीमा सर्वांनी राखली पाहिजे. मात्र निकाल दोन दिवसांवर आल्यानंतरही अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटत असतील तर त्याचा अर्थ काय काढायचा? यावर त्यांनी मतदारसंघातील कामे असल्याचा खुलासा केला. मात्र अनेक वर्षांपासून ते आमदार असताना ते काय करत होते? याच्यातून हा निकाल असा लागेल असे वाटत होते. याचा एकूण अर्थ काय की, अध्यक्षांनी दिलेला निर्णय हा न्यायावर, घटनेवर, सु्प्रीम कोर्टाच्या निकालांच्या आधारावर दिल्याचे वाटत नाही,' असे म्हणत पवारांनी 'हे इतरांनाही लागू होण्याची शक्यता नाकारता येत नाही,' असेही स्पष्ट केले.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.