Shivsena Political News : कांदिवलीत शिंदे गटाची दादागिरी; अनधिकृत बॅनर्स काढण्यासाठी गेलेल्या पालिका कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण

Eknath Shinde Shivsena Group : शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि त्यांच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai: मुंबईच्या कांदिवली पश्चिमेकडील एमजी रोड परिसरातील अनधिकृत बॅनर्स काढण्यासाठी गेलेल्या पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

शिवसेनेचे शाखाप्रमुख आणि त्यांच्या दहा ते बारा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप पालिका कर्मचाऱ्यांनी केला आहे. आर/दक्षिण कार्यालयातील परीरक्षण विभागाचे सहायक अभियंता व वरिष्ठ निरीक्षक विभागाचे अधिकारी यांना ही मारहाण करण्यात आली आहे.

Eknath Shinde
Amol Kolhe News : 'या' महिन्यातील संसदेचं अधिवेशन लोकसभेचं शेवटचं ठरणार,मुदतपूर्व निवडणुका डिसेंबरमध्ये होणार ? खासदार कोल्हेंचा मोठा दावा

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी पालिका आयुक्त इकबाल सहल यांना मुंबईतील अनधिकृत बॅनर्स आणि खड्ड्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसारच शुक्रवारी दुपारी कांदिवली पश्चिमेकडील एमजी रोड लिंक रोड जंक्शन परिसरातील अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी पोहोचले गेले होते.

शिवसेना शिंदे गटाचे शाखाप्रमुख प्रकाश गिरी आणि त्यांच्या पंधरा ते वीस कार्यकर्त्यांनी पालिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना धमकावून शिवीगाळ करत बेदम मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे ठाकरे गट(Thackeray Group) आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Prakash Ambedkar On India Alliance : राजकारणात आम्हाला अस्पृश्यतेची वागणूक; प्रकाश आंबेडकरांची खंत‍ !

या झालेल्या मारहाणीमुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मारहाणीच्या या घटनेनंतर पालिका अधिकारी तक्रार देण्यासाठी कांदिवली पोलीस ठाणे येथे पोहोचले असून कांदिवली पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com