Shivsena: शिवसेनेच्या 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस; पण आदित्य ठाकरेंना नाही

Eknath Shinde| Aditya Thackeray| Shivsena| शिंदे सरकारला फ्लोअर टेस्टमध्ये 164 मते मिळाली. तर विरोधकांना 99 मते मिळाली.
Aditya Thackeray News, Shivsena News, Shivsena Latest Marathi News
Aditya Thackeray News, Shivsena News, Shivsena Latest Marathi News

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी सोमवारी झालेल्या फ्लोअर टेस्टनंतर शिवसेनेच्या आमदारांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिंदे गटाने शिवसेनेच्या 14 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावली आहे. शिंदे गटाचा व्हीप न पाळणाऱ्या सर्व आमदारांना अपात्र ठरवण्याची नोटीस आम्ही दिली असल्याचं गोगावले यांनी सांगितलं. मात्र, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आदर असल्याने त्यांनी आदित्य ठाकरे यांना अपत्रतेची नोटीस बजावली नाही.(Shivsena Latest Marathi News)

याबाबत बोलताना भरत गोगावले म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आता आदित्य ठाकरे यांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेतील. शिंदे-भाजप सरकारची गुरुवारी विधानसभेत फ्लोअर टेस्ट झाली,ज्यात त्यांनी बहुमत मिळवले. फ्लोअर टेस्ट पूर्वी शिंदे गटाने उद्धव ठाकरे गटातील आमदारांना व्हीप बजावला होता. शिंदे सरकारला फ्लोअर टेस्टमध्ये 164 मते मिळाली. तर विरोधकांना 99 मते मिळाली.(Eknath Shinde News)

Aditya Thackeray News, Shivsena News, Shivsena Latest Marathi News
तर आदित्य ठाकरे यांची आमदारकी धोक्यात येणार ...

शिवसेनेच्या आमदारांनी भरत गोगावले यांचा व्हीप झुगारून महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे त्यांच्यावर हो कारवाई करण्यात येत आहे. यावर आदित्य ठाकरे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे." सुनील प्रभू हेच शिवसेनेचे अधिकृत प्रतोद आहेत. त्यांचाच व्हीप कायदेशीर असून शिवसेनेच्या आमदारांना लागू होईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे. इतकच नव्हे तर, मी शिवसेना आमदार आणि सर्व सामान्य शिवसैनिकांसोबतच कायम उभा राहीन, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी काढलेल्या व्हीपचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाविकास आघाडीतील आदित्य ठाकरे वगळता शिवसेनेच्या 14 आमदारांच्या निलंबनाची मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. यानुसार या 14 आमदारांना निलंबनाची नोटीस बजावण्यात आली आहे. यामुळे महाविकास आघाडीसोबत असलेल्या शिवसेनेच्या 14 आमदारांची आमदारकी धोक्यात आली आहे. पक्षाने काढलेला व्हिप न बजावल्यामुळे त्यांच्यावर विधिमंडळात कारवाई होण्याची शक्यताही आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com