Shivsena Dasara Melava: 'गट प्रमुख' नाही 'कट प्रमुख'! एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ; सगळंच काढलं

Shivsena Dasara Melava 2025: शिवसेना का फुटली, अनेक नेते आजवर बाहेर का पडले हे सांगताना एकनाथ शिंदेंनी आज उद्धव ठाकरेंवर दसरा मेळाव्यातून तोफ डागली.
Eknath Shinde Shivsena Dasara Melava
Eknath Shinde Shivsena Dasara Melava
Published on
Updated on

Shivsena Dasara Melava 2025: शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज उद्धव ठाकरे यांनाच एकमेव टार्गेट केलं. शिवसेना का फुटली? इथपासून मुंबई महापालिका निवडणुकीपर्यंत अनेक मुद्द्यांवर आणि टीका-टिप्पण्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी उद्धव ठाकरेंचा उल्लेख त्यांनी 'पक्ष प्रमुख' नव्हे तर 'कट प्रमुख' असा केला. पण नेमकं शिंदे काय म्हणाले? ऐकुयात.

Eknath Shinde Shivsena Dasara Melava
Shivsena UBT Dasara Melava: "जानवं घालून अदानीला समर्पयामी करणार का?" 'महापौर' मुद्द्यावरुन ठाकरे भाजपला डिवचलं

एकनाथ शिंदे म्हणाले, बाळासाहेबांनी काँग्रेसी पंचसुत्री गाडून टाकायचं म्हटलं होतं. पण ते गाडायचं सोडून तुम्ही डोक्यावर घेतलं हे तुमचं हिंदुत्व आहे. जेव्हा मुख्यमंत्र्यांची खुर्ची तुम्हाला पाहिजे होती तेव्हा बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले, त्यांचे विचार विसरले. आता बाळासाहेबांचा विचार तुम्हाला यायला लागला? हे सगळं तुम्ही एका खुर्चीसाठी घालवलं. पक्षाचा प्रमुख पक्षातले लोक घालवण्यासाठी कधी कारस्थान करतो? रामदास कदम यांनी याची उदाहरणं सांगितलेली आहेत. मी पुन्हा ती सांगणार नाही. याला संपव त्याला संपव, त्याला संपव. हे पक्ष प्रमुख नाहीत हे कारस्थान करणारे कट प्रमुख आहेत. गट प्रमुख नाही कट प्रमुख! म्हणून ही परिस्थिती झाली.

Eknath Shinde Shivsena Dasara Melava
Simi Garewal: रावण दहनाचं कुठलंही हार्ड फिलिंग नाही! संसदेतल्या अर्ध्या लोकांपेक्षा तू...; अभिनेत्री सिमी गरेवाल यांचं रावणाला पत्र

आम्हाला गेला तो कचरा म्हणता! पण कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही? हे लोक का जातात? कशासाठी? यात कोणाची चूक आहे. हजारो लाखो लोक चुकीचे आणि एक माणूस बरोबर? असं कसं होईल. जगात असा कुठल्याही पक्षाचा प्रमुख अध्यक्ष नसेल की जो स्वतःच्याच पक्षातील लोकांना संपवण्याची भूमिका घेणारा असेल. आज आठवा बाळासाहेब असताना किती मोठे नेते बसायचे सोबत, ते वैभव आठवा. आता काय परिस्थिती आहे? याला जबाबदार कोण?

Eknath Shinde Shivsena Dasara Melava
Manoj Jarange Melava: मनोज जरांगेंनी शिवराळ भाषेच्या 'सीमा' ओलांडल्या! 40 मिनिटांच्या भाषणात व्यक्त केली खदखद

आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्यानंतरही त्यांची सावली देखील त्यांच्यासोबत राहील की नाही? शिवसैनिक तर सोडा, अशा शब्दांत यावेळी एकनाथ शिंदे यांनी दसरा मेळाव्यात ठाकरेंवर तोफ डागली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com