Shivsena Mla Disqualification Result : शिंदेंच्या बाजूने निकाल लागताच गोगावलेंनी सुनील प्रभूंसमोर जोडले हात!

Bharat Gogawale - Sunil Prabhu : अध्यक्षांनी हा निकाल दिल्यानंतर भरत गोगावले यांनी सुनील प्रभूंना हाक मारली.
Bharat Gogawale - Sunil Prabhu
Bharat Gogawale - Sunil Prabhu Sarkarnama

Shivsena MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्र निकालाबाबत विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऐतिहासिक निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांची खरी शिवसेना आहे आणि त्यांचे आमदार अपात्र होणार नसल्याचा निर्णय अध्यक्षांनी दिला. भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड वैध असल्याचा निकालदेखील त्यांनी दिला.

महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देण्याची क्षमता असलेला शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाचे वाचन बुधवारी (ता.10) केले. या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या निकालात विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) या निकालात शिवसेनेची 1999 ची घटना वैध असून 2018 मध्ये ठाकरेंनी केलेली घटनादुरुस्ती आणि प्रतिज्ञापत्रही अमान्य असल्याचे विधानही त्यांनी केलं आहे.

Bharat Gogawale - Sunil Prabhu
Shivsena MLA Disqualification Result : राहुल नार्वेकरांनी 102 मिनिटे वाचन करत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा निकालाच लावला

भरत गोगावलेंनी जोडले हात

विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच (Eknath Shinde) आणि शिंदे गटातील सर्व आमदार पात्र म्हणून निर्णय दिला. शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची निवडदेखील त्यांनी वैध असल्याचा निर्णय दिला. सुनील प्रभू यांचा व्हीप आमदारांना लागू होणार नाही आणि त्यामुळे शिंदेंचे आमदार हे पात्र ठरतात, असा निर्णय राहुल नार्वेकर यांनी दिला.

अध्यक्षांनी हा निकाल दिल्यानंतर भरत गोगावले यांनी सुनील प्रभूंना हाक मारून त्यांच्यापुढे हात जोडले. सुनील प्रभू हे बाहेर जायला निघताच गोगावले यांनी त्यांच्या पुढ्यात हात जोडले. यावेळी गोगावलेंच्या चेहऱ्यावर जिंकण्याचा आनंद दिसला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरी शिवसेना कुणाची, हे ठरवण्याचा अधिकार मलाच आहे, असं आज राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची ही घटनाच हे सांगते आहे, की त्यात कशी पदरचना आहे. त्यानुसारच खरी शिवसेना कुणाची आहे? याचा निर्णय घेतला आहे. 21 जून 2022 ला शिवसेनेत दोन गट पडले. सगळ्या पुरावे, साक्षी यांचा विचार करता मी शिंदे गटाची शिवसेना (Shivsena) हीच खरी शिवसेना आहे ही मान्यता देतो, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

सुभाष देसाई विरुद्ध राज्यपाल या प्रकरणाचं वाचन आधी राहुल नार्वेकर यांनी केलं आहे. दोन्ही गटांनी वेगवेगळ्या घटना दिल्या आहेत, त्यामुळे मी निवडणूक आयोगाने दिलेली घटना विचारात घेतली आहे, असेही राहुल नार्वेकर यांनी निकालात वाचताना म्हटलं आहे. दोन्ही गटांमध्ये पक्षप्रमुख कोण, यावरून गोंधळ असल्याचं दिसलं. उद्धव ठाकरेंनी जी शिवसेनेची घटना दिली त्यावर कुठलीही तारीख नाही, असंही राहुल नार्वेकर म्हणाले. शिवसेनेची 1999 ची घटना मी मान्य करतो असंही राहुल नार्वेकर म्हणाले. तसंच उद्धव ठाकरे हे उलटतपासणीसाठी आले नाहीत, त्यामुळे त्यांचं प्रतिज्ञापत्र विचारात घेतलेलं नाही, असंही ते म्हणाले.

R...

Bharat Gogawale - Sunil Prabhu
Ujjwal Nikam: नार्वेकरांच्या निकालानंतर उज्ज्वल निकमांची पहिली प्रतिक्रिया; निर्णय केवळ पक्षप्रमुखच घेऊ शकत नाहीत, तर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com