महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सांगितली 'स्ट्रॅटेजी'!

शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

Sarkarnama

Published on
Updated on

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकांसाठी (Municipal Elections) शिवसेनेने (Shivsena) कंबर कसली आहे. खुद्द शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत या निवणुकांचे रणशिंग फुंकले आहे. आमच्यावर होणाऱ्या वैयक्तिक आरोपांना उत्तर देत बसू नका, असा सल्ला त्यांनी दिला आहे. याचवेळी शिवसेनेने महापालिका, राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांपर्यंत पोचवा, असा कानमंत्रही त्यांनी दिला आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार या महापालिकांसह राज्यातील 15 महापालिकांच्या निवडणुका या वर्षी होत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेसाठी ही निवडणूक महत्त्वाची आणि प्रतिष्ठेची आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: दृकश्राव्य माध्यमातून शिवसेना नेते आणि मुंबईतील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

Uddhav Thackeray
बड्या नेत्याचा आमदारकीच्या राजीनाम्याचा डाव अन् त्यावर काँग्रेसनं टाकला प्रतिडाव

या बैठकीत ठाकरे कुटुंबीयांवर होत असलेल्या आरोपांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर मात्र आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणात अडकून न राहण्याचा सल्ला ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला. ठाकरे म्हणाले की, आमच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तरे देण्यात वेळ वाया घालवू नका. आम्ही ते काम करू. शिवसेनेने महापालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून केलेली कामे मतदारांपर्यंत पोचवा.

Uddhav Thackeray
कार्यकारिणीत डावललं जाताच भाजप आमदाराचा थेट बंडाचा पवित्रा

कोरोना काळातील मुंबई महापालिका आणि राज्य सरकारच्या कामांचाही ठाकरे यांनी आवर्जून या बैठकीत उल्लेख केला. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत 2017 मध्ये भाजपने शिवसेनेला चांगली टक्कर दिली होती. यंदाही भाजप पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढणार आहे. त्यामुळे मागील 30 वर्षांपासून मुंबई महापालिकेवर असलेले वर्चस्व टिकवून ठेवण्याचे आव्हान शिवसेनेसमोर आहे.

मुंबई महापालिकेतील सध्याचे संख्याबळ

एकूण नगरसेवक - 223 (चार जागा रिक्त)

शिवसेना - 97

भाजप - 83

काँग्रेस - 29

राष्ट्रवादी काँग्रेस - 8

समाजवादी पक्ष - 6

महाराष्ट्र नवनिर्माण सेना - 1

एआयएमआयएम - 2

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com